ऊर्जामंत्री बावनकुळे आज हिंगोली दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरण ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. आज सकाळी त्यांचे हिंगोलीला आगमन होणार आहे.

हिंगोली - राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरण ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. आज सकाळी त्यांचे हिंगोलीला आगमन होणार आहे.

डीडीयुजीजेवाय योजनेअंतर्गत मंजूर 33 केव्ही व 11 के.व्ही. उपकेंद्र समगा, जयपूर जवळा, रूपूरतांडा, माझोड, पळशी, पारडी, सेलू व आयपीडीएस योजनेअंतर्गत खाकीबाबा मठ हिंगोली, लमानदेव कळमनुरी येथील मंजूर विद्युत उपकेंद्राचे अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, हिंगोलीतील प्रांगणात भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय प्रांगणात श्री. बावनकुळे सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांकडून तक्रारी, निवेदने, सूचना स्वीकारून त्याचे निवारण करतील. महावितरण व महापारेषण कंपनींचे कनिष्ठ अभियंता ते वरिष्ठ स्तर अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक ते वरिष्ठ स्तर अधिकारी, महाऊर्जाचे अधिकारी व विद्युत निरीक्षक उपस्थित राहणाणर आहेत.

दुपारी दोन वाजता लोकप्रतिनिधींसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी महावितरण/महापारेषण कंपनींचे कार्यकारी अभियंता ते वरिष्ठस्तर अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक ते वरिष्ठस्तर अधिकारी, महाऊर्जाचे अधिकारी व विद्युत निरीक्षक उपस्थित राहतील.

Web Title: Chandrashekhar Bawankule is on tour of Hingoli