esakal | चापोली-कपिलधार पदयात्रा मार्गस्थ, चापोलीकरांनी जपली ६५ वर्षांची परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

chapoli news.jpg

नियमांचे पालन करीत पदयात्रेला प्रारंभ. 

चापोली-कपिलधार पदयात्रा मार्गस्थ, चापोलीकरांनी जपली ६५ वर्षांची परंपरा

sakal_logo
By
डॉ. रविंद्र भताणे

चापोली (लातूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करीत रविवारी (ता. २२) चापोली ते कपिलधार पदयात्रा मार्गस्थ झाली. यात काही ठरावीक भाविकांनीच सहभाग घेतला होता.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेली ६५ वर्षांची परंपरा असलेली ही पदयात्रा खंडित होऊ नये यासाठी चापोलीकरांनी साध्या पद्धतीने व मोजक्याच भक्तांना पदयात्रेत सहभागी करून घेत पदयात्रेची परंपरा टिकवून ठेवली. काही दिवसांपूर्वीच पदयात्रेचे प्रणेते राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे निधन झाले. त्यांनी आजपर्यंत ६५ वर्षे नित्यनेमाने पदयात्रे सोबत ठिकठिकाणी भक्तांना मार्गदर्शन करीत असते. मात्र, यंदा प्रथमच त्यांच्या अनुपस्थित ही पदयात्रा निघाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची अहमदपूर येथील समाधी असलेल्या भक्ती स्थळावर भक्तांनी शनिवारी (ता. २१) जाऊन पूजा करून पदयात्रेस प्रारंभ केला. रविवारी (ता. २२) पदयात्रा मार्गस्थ झाली. त्यांच्या आठवणीने येथील भाविकांना गहिवरून आल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी भक्तांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ही पदयात्रा प्रातिनिधिक स्वरूपात असल्याने या पदयात्रेला मोठी स्वरूप नव्हते. ही पदयात्रा चाकूर, वडवळ जानवळ पानगाव मार्गे कपिलधार येथे जाणार आहे. यावेळी आचार्य गुरुराज महाराज, बालयोगी बालानंद महाराज, भगवान पाटील मन्मथ पालापुरे आदी उपस्थित होते.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मास्क व सॅनिटायझरचे वाटप 
चापोली ते कपिलधार पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना माजी पंचायत समिती सदस्य नीलेश मद्रेवार यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. 

(संपादन-प्रताप अवचार)