औरंगाबाद - चार्टर्ड अकाउंटंट्‌स राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

औरंगाबाद : "चार्टर्ड अकाउंटंट्‌स (सीए) देशाच्या आर्थिक विकासाची मुळे आहेत. देशात सीएची गरज आहे. त्यामुळे आपण मुलांना प्रोत्साहित करून नवे सीए घडविण्यासाठी पुढे यावे'', असे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ला यांनी शनिवारी (ता. 16) येथे केले. 

इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌सच्या औरंगाबाद, लातूर, अकोला आणि अमरावती विभागांच्या वतीने शहरात दोनदिवसीय सीए राष्ट्रीय परिषदेचे त्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, "सीए ही संस्था आहे. त्यांना समाजात प्रतिष्ठात म्हणून ओळखले जाते. समाज या पदाचा आदर करतो. सीएंनी ग्राहकांप्रती आपली विश्‍वासहर्ता वाढवावी. सीए शिवाय आर्थिक विकास अशक्‍य आहे. यामुळे तुमच्या सूचनांवर चर्चा करून काय बदलाच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. इंजिनअरिंगची संख्या ज्या प्रमाणे वाढत आहे. त्याच प्रमाणात सीएची संख्या वाढायला हवी. सीएची संख्या वाढविण्यासाठी इन्स्टिट्युटने पुढे यावे.'' 

सुविधा देऊनही मासिक कर भरण्यास उदासिनता 
उद्योग, व्यापाऱ्यांसाठी जीएसटी ही सोपी प्रणाली आहे. जीएसटी लागू झाल्यावर व्यापारी, सीए आणि इतरांच्या सूचनेप्रमाणे अनेक बदल केले. मासिक कर भरणाची सुविधा दिली. तरीही व्यापारी, नागरिक कर भाण्यास उदासीन आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या येणारे 34 टक्‍के कर आम्ही पाच, बारा आणि 28 टक्‍क्‍यांवर आणले तरही उदासिनता कायम आहे, अशी खंत यावेळी शुक्‍ला यांनी व्यक्त केली

Web Title: chartered accountants national conference starts