साहित्य संमेलनात लोकशाहीवर गप्पा - श्रीकांत देशपांडे

निवडणूक हा लोकशाहीचा एक घटक आहे. निवडणुकीशिवाय लोकशाहीसाठी अनेकजण प्रयत्न करतात. तसे पाहिले तर लोकशाही ही एक जीवनपद्धती असून तिची सुरुवात कुटुंबापासून सुरू होते.
Shrikant Deshpande
Shrikant Deshpandesakal
Summary

निवडणूक हा लोकशाहीचा एक घटक आहे. निवडणुकीशिवाय लोकशाहीसाठी अनेकजण प्रयत्न करतात. तसे पाहिले तर लोकशाही ही एक जीवनपद्धती असून तिची सुरुवात कुटुंबापासून सुरू होते.

लातूर - निवडणूक (Election) हा लोकशाहीचा (Democracy) एक घटक आहे. निवडणुकीशिवाय लोकशाहीसाठी अनेकजण प्रयत्न करतात. तसे पाहिले तर लोकशाही ही एक जीवनपद्धती असून तिची सुरुवात कुटुंबापासून सुरू होते. समाजातील विविध घटकांना याची जाणीव आहे का, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न लोकशाही गप्पाच्या उपक्रमातून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सुरू केला आहे. उदगीरच्या साहित्य संमेलनात शुक्रवारी (ता. २२) आयोजित `लेखक आणि लोकशाही मुल्ये` या विषयावरील परिसंवाद हा उपक्रमाचा सहावा भाग आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी (ता. २१) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सूचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, तहसीलदार स्वप्निल पवार, नायब तहसीलदार एच. ए. काळे या वेळी उपस्थित होते. श्री. देशपांडे म्हणाले, की मतदार जागृतीच्या पारंपारिक उपक्रमांना छेद देणारे उपक्रम मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सुरू केले आहेत. कार्यालय लोकाभिमूख करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी कार्यालयाने सहविचारगटाची स्थापना केली असून राज्यातील शंभर नामांकित व्यक्तींना त्यात सहभागी करून घेतले आहे. नाशिकच्या साहित्य संमेलनातील यशस्वी सहभागानंतर उदगीरच्या संमेलनातही संधी मिळाली. नाशिकच्या संमेलनातील विषय हा साहित्याशी संबंधित होता. लोकशाहीतील लेखकांच्या भूमिकेला कुठे तरी व्यासपीठ मिळावे, यासाठी संमेलनात परिसंवाद ठेवण्यात आला. लोकशाही मुल्यावर हल्ले झाले आहेत. मुस्कटदाबी सुरू झाली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी कुठे तरी व्यासपीठ मिळण्याची गरज होती. म्हणून कार्यालयाने साहित्य संमेलनात सहभाग घेतल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

निवडणुकीचा विषय शिक्षणात

लोकसंख्येत १८ ते १९ वर्ष वयोगटातील साडेतीन टक्के युवक असले तरी त्यापैकी केवळ अर्धा टक्का मतदार आहेत. २० ते २९ वयोगटातील १८ टक्के युवकांपैकी १३ टक्के यादीत आहेत. यादीतील किती टक्के मतदान करतात, हा संशोधनाचा विषय आहे. यामुळे निवडणूकीचा विषय शिक्षणात आणण्याचे प्रयत्न आहेत. पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून क्रेडीट कोर्सही सुरू केला आहे, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

पुस्तक आता प्रादेशिक भाषेत

लोकशाहीसाठी मतदारांचा मतदानातील सहभाग वाढला पाहिजे. यामुळेच कार्यालयाने डॉ. दीपक पवार संपादित `लोकशाही समजून घेताना` हे पुस्तक प्रकाशित केले. शिक्षण, राजकारण, समाजकारण, कुटुंब व अन्य क्षेत्रातील लोकशाही कशी आहे. दिव्यांगांसह अन्य घटकांना वाटणारी लोकशाही कशी आहे. सर्वांपर्यत लोकशाही खऱ्या अर्थाने पोहचली आहे का, याचा अंदाज घेऊन अजून किती पल्ला गाठायचा आहे. याचा उहापोह पुस्तकात आहे. या पुस्तकाची दखल नॅशनल बुक ट्रस्टने घेतली असून लवकरच हे पुस्तक सर्व प्रादेशिक भाषेत अनुवादीत होऊन प्रकाशित केले जाणार असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com