छावणीच्या बैठकीत आचारसंहितेचे सावट 

अनिलकुमार जमधडे 
मंगळवार, 22 जानेवारी 2019

औरंगाबाद : आचारसंहितेच्या सावटाखाली छावणी परिषदेची बैठक झाली. बैठकीत आचारसंहिता लागल्यानंतर कामांवर परिणाम होईल म्हणून विविध विकास कामांना मंजूरी देण्यात आली. 

छावणी परिषदेची बैठक मंगळवारी (ता. 22) अध्यक्ष ब्रिगेडीयार डी. के. पात्रा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीतला मुख्याधिकारी विजयकुमार नायर, उपाध्यक्ष पद्मश्री जैस्वाल, प्रतिभा काकस, प्रशांत तारगे, शेख हनिफ, संजय गारोल, मिर्झा रफत बेग यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता येत्या महिनाभरात लागू शकते या शक्‍यतेने बैठकीत विविध विषयावर चर्चा करुन धडाधड निर्णय घेण्यात आले.

छावणीतील सरकारी रुग्णालयातील कंत्राटी परिचारिकांना वेतन यापुढे दहा तारखेपुर्वी करण्यात येईल. चिकन, मटन मार्केटचा ठेकेदार मिळत नसल्याने सध्याच्या ठेकेदारांना तीन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. पेव्हरब्लॉक, सिमेंट रस्त्यांच्या कामाचे ठेकेदारांचे काम निकृष्ट असल्याने हे ठेकेदार शहरात रिंग रोड, बायपास रोडमुळे शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या कमी झाल्याने, वाहन प्रवेश कर ठेकेदाराला वारंवार सुट द्यावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन धावणाऱ्या वाहनांचा शासकीय यंत्रणेमार्फत सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Web Title: chawani meeting Aurangabad