कमी दरातील घरे सर्वप्रथम रेल्वे पोलिसांना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नांदेड - राज्य सरकारने पोलिसांना कमी दरात घरे ही योजना जाहीर केल्यानंतर सर्वांत प्रथम आलेला प्रस्ताव व मागणी लक्षात घेऊन नागपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर लोहमार्ग पोलिसांना 40 टक्के कमी दरात सरकारी घर मिळणार आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले असल्याने, राज्यात सर्वांत अगोदर लोहमार्ग पोलिसांना ही घरे मिळणार असल्याची माहिती नागपूर लोहमार्ग पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नांदेड येथे दिली. 

लोहमार्ग पोलिस नागपूर अंतर्गत येणाऱ्या नांदेडच्या भेटीसाठी बलकवडे येथे आले होते. नागपूर लोहमार्गाची हद्द मोठी असून रेल्वेचे जाळे या हद्दीत जास्त आहे. नागपूर रेल्वे पोलिस उत्तम काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्‍न मार्गी लागावा त्यासाठी पदभार घेतला तेव्हापासून सतत पाठपुरावा करीत आहे. आमच्या प्रस्तावाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली व सर्वांत अगोदर लोहमार्ग पोलिसांना 40 टक्के कमी दराने घर देण्याचा निर्णय घेतला. नागपूर येथे हे संकुल लवकरच उभे राहील, असा विश्‍वास बलकवडे यांनी व्यक्त केला. 

Web Title: Cheap houses for the first time, the railway police