कापूस खरेदीत 28 शेतकऱ्यांची फसवणूक 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - कापूस खरेदी करून करमाड परिसरातील व्यापाऱ्यांसह 28 शेतकऱ्यांना फसविणाऱ्या गुजरातच्या चार व्यापाऱ्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी फेटाळला.

 राजूभाई जोशी, गौरव राजकोट, राकेश आचार्य व अजय जोशी (रा. सर्व राजकोट, गुजरात) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात संतोष निवृत्ती वाघ (वय 27, रा. शेकटा) यांनी तक्रार दिली. त्यानुसार वाघ यांचा कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. वर्ष 2016 मध्ये त्यांनी सोमनाथ कॉटेक्‍स जिनिंगचे मालक राजूभाई जोशी यांच्याशी तोंडी करार केला होता. त्यानुसार वाघ यांना प्रतिक्विंटल 70 रुपये कमिशन देण्याचे ठरले होते. त्यानुसार वाघ यांनी शेकटा परिसरातील शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन राजूभाई जोशी यांना विकला. त्यांनी 208 ट्रकमध्ये 15 कोटी 54 लाख 76 हजार 775 रुपये किमतीचा 27 हजार 125 क्विंटल वजनाचा कापूस सोमनाथ कॉटेक्‍स जिनिंगला पाठविला होता. विक्री केलेल्या कापसाच्या रकमेपोटी 14 कोटी 74 लाख 60 हजार 710 रुपये जिनिंगने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात आरटीजीएसद्वारे जमा केले; मात्र 28 शेतकऱ्यांच्या कापसाचे 61 लाख 70 हजार 686 रुपये व वाघ यांचे कमिशन 19 लाख 150 रुपये असे एकूण 80 लाख 16 हजार 65 रुपये दिलेच नाही.

त्यामुळे वाघ हे पैसे घेण्यासाठी राजकोट येथे गेले. त्या वेळी त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. या फसवणूक प्रकरणात करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणात अटक होऊ नये, यासाठी चारही जणांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com