क्‍लोनिंग केलेल्या चेकद्वारे बॅंकांना कोट्यवधींचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

औरंगाबाद - क्‍लोनिंग केलेल्या चेकद्वारे पैसे काढून विविध राज्यांतील बॅंकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबादेत अशापद्धतीने चार लाख 80 हजार रुपये परस्पर काढण्यात आले. यात पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. 

मानीषकुमार जयराम मोर्या ऊर्फ राकेश (वय 23, रा. उत्तर प्रदेश), हरीश गोविंद गुंजाळ (वय 39, रा. माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), मनदीपसिंग बनारसीदाससिंग (वय 29, रा. दीनानगर, गुरुदासपूर, पंजाब), रशीद इम्तियाज खान (वय 50, नालासोपारा, रा. पालघर मुंबई, मूळ उत्तर प्रदेश) आणि डब्ल्यू. शेख अरमान शेख (वय 32, रा. पश्‍चिम बंगाल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. हरीश गुंजाळ याच्या नावाने औरंगाबादेत विविध बॅंकांमध्ये 19 खाती असून, तीन बॅंकांमधून संशयितांनी क्‍लोनिंग चेकद्वारे चार लाख रुपये काढले होते. 

...अशी होती शक्कल 
ज्या शहरात बॅंका, फर्म अथवा कंपनीला टार्गेट करायचे त्या शहरात खोली भाड्याने घ्यायची. भाडेकराराची कागदपत्रे व पत्ता वापरून दुकान परवाना व जीएसटी क्रमांक मिळवला जात असे. नंतर बॅंकेत खाते उघडून चेकबुक मिळवायचे आणि बॅंकेतील मोठे ग्राहक शोधून त्यांचा खाते व चेक क्रमांक मिळवून त्याचे क्‍लोनिंग करायचे. मग त्यावर बनावट सही करून पैसे काढायचे.

Web Title: Check cloning of banks worth millions