नांदेड : प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या उपस्थितीत जिल्हा कारागृहाची तपासणी

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नांदेड : जिल्हा कारागृहातील बॅरेकची पहाणी करून बांधकाम व देखाल दुरूस्ती तातडीने करण्याच्या सुचना सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. एस. खरात यांनी दिल्या. कारागृहातच जेल संबंधित विभागाच्या वरिष्ठांची आढावा बैठक सोमवारी (ता. 22) घेण्यात आली.

नांदेड : जिल्हा कारागृहातील बॅरेकची पहाणी करून बांधकाम व देखाल दुरूस्ती तातडीने करण्याच्या सुचना सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. एस. खरात यांनी दिल्या. कारागृहातच जेल संबंधित विभागाच्या वरिष्ठांची आढावा बैठक सोमवारी (ता. 22) घेण्यात आली.

सर्वाेच्च न्यायालयांच्या आदेशान्वये विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचीव तथा न्यायाधीश डी. टी. वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कारागृह प्रभारी अधिक्षक यु. एन. गायकवाड, साबांचे कार्यकारी अभियंता ग. ही. राजपुत, अॅड. प्रविण अयाचीत, सुषमा गहेरवार, परिविक्षा अधिकारी बी. पी. बडवणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ध. पो. शाहू यांची  उपस्थिती होती.   

यावेळी न्यायाधिश एस. एस. खरात यांनी कारागृहातील बॅरेकची पाहणी करून लवकर बॅरेकचे बांधकाम करण्याचे व आवश्यक ती दुरूस्ती करण्याबाबत कार्यकारी अभियंता यांना निर्देशित करण्यात आले. तसेच वैद्यकिय सुविधा, कैद्यांना येणाऱ्या विविध समस्यांबाबत जाणुन घेऊन आवश्यक त्या सुचना कारागृह अधिक्षक यांना देण्यात आल्या. महिला आरोपी व त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांबाबत महिला व बालविकास अधिकारी यांचेशी चर्चा करण्यात आली. कारागृहात बंद्यांना वैद्यकिय उपचार देण्यासाठी व न्यायालयात तारखेस कैद्यांना हजर करणेकामी गार्डची नेमणुक करण्याबाबत पोलीस अधिक्षक यांना कळविण्यात आले. कारागृह परिसर, स्वयंपाक गृहाची पाहणी करून आवश्यक त्या सुचना कारागृह प्रशासनाला देण्यात आल्या. 

त्याचप्रमाणे ज्या कैद्यांनी विधी सेवा सहायता मिळणेसाठी विनंती केले आहे. अशा कैद्यांचे अर्ज ताबडतोब जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठवावे. जेणेकरून संबंधित कैद्यांना लवकर विधी सेवा मिळवुन देता येईल असे न्यायाधीश डी. टी. वसावे यांनी सांगितले. 

Web Title: checking of district jail by Chief District Judge in nanded