काच निखळल्याच्या घटनेनंतर स्कूलबसची तपासणी मोहीम

अनिल जमधडे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

औरंगाबाद : स्कूल बसची काच निखळल्याने दोन विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरटीओच्या पथकाने शुक्रवारी (ता.7) स्कूल बसच्या विरोधात व्यापक कारवाई केली. सकाळी सहा वाजेपासून तब्बल 100 बसच्या विरोधात कारवाई करण्यात आली.

तीन दिवसांपूर्वी गोवर रुबेला लस देण्यासाठी शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन बस निघाली होती. त्यावेळी बसची पाठीमागची काच निखळून पडली होती. त्यात दोन विद्यार्थी खाली पडून जखमी झाले होते.

या घटनेनंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ पथकाने शुक्रवारी एकाच वेळी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्कूलबसची तपासणी केली. या तपासणी मोहिमेत तब्बल 100 स्कूल बसवर कारवाई करण्यात आली आहे. पहाटे पाच वाजता सुरू करण्यात आलेली ही कारवाई सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होती. या तपासणीत 100 स्कूल बसवर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: checking of school bus in aurangabad