नाशिकमधून लढल्यास भुजबळांना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

औरंगाबाद - छगन भुजबळ हे स्वतः नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार राहिले, तर त्यांना वंचित आघाडीचा पाठिंबा राहील, असा प्रस्ताव वंचित आघाडीच्या बैठकीत भुजबळ यांना देण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत मात्र आघाडीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे वंचित आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. 

मागील आठवड्यात भुजबळ आणि बाळासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आज वंचित आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. ‘भुजबळ ओबीसी नेते आहेत. त्यांच्यावर आकसबुद्धीने विविध गुन्हे दाखल करून त्यांना राजकीय, सामाजिक जीवनातून उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे या नेत्यांनी सांगितले. 

देशात महाआणीबाणी 
देशात कुणाला बोलू दिले जात नाही. २०१४ मध्ये मोदी विकास-विकास करीत होते; मात्र नंतर मंदिर-मशीद, मराठा विरुद्ध दलित असे चित्र उभे केले जात आहे. देशात आणीबाणी नव्हे; तर महाआणीबाणी सुरू आहे, ,असे भुजबळ आज म्हणाले.

Web Title: Chhagan Bhujbal NCP Support Politics