Chhatrapati Sambhajinagar : पैशांच्या वादातून मित्राच्या वडिलांचा खून; आरोपी तत्काळ पोलिसांच्या ताब्यात

विशेष म्हणजे खून करणारा आरोपीही जखमी झाला असून, पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतल्याची माहिती बेगमपूरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिली.
Crime
Crime sakal

Chhatrapati Sambhajinagar - जुना वाद अन् पैशांची देवाण घेवाण यातून एका तरुणाने मित्राच्या वडिलांचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी (ता. १२) साडेआठ वाजेदरम्यान टाऊन हॉलकडून मकाई गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

कैलास रामचंद्र वाकेकर (४७, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, अजय काशिनाथ चव्हाण (२५, रा पेठेनगर, भावसिंगपूरा परिसर) असे खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.

विशेष म्हणजे खून करणारा आरोपीही जखमी झाला असून, पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतल्याची माहिती बेगमपूरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, मृत कैलास वाकेकर यांना दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांसोबत आरोपी अजय याची मैत्री आहे.

Crime
Pune News : छुप्या संदेशाला डिकोड करणारी प्रणाली संरक्षण क्षेत्राला मिळणार - डॉ. सी.पी.रामनारायणन

दरम्यान, अजय हाही काही वर्षापूर्वी जयभीमनगरात राहत होता. कैलास वाकेकर रंगकाम करत असत, तर चव्हाण हा रोजंदारीवर काम करत असे. त्यामुळे त्याचा कामावर येण्याजाण्याचा मार्ग टाऊन हॉल परिसरातूनच होता.

शुक्रवारी तो घराकडे जात असताना रस्त्यावरच कैलास वाकेकर यांच्यासोबत पैशाच्या व्यवहारातून दोघात वाद सुरू झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, अजयने त्यांना रस्त्यावर पाठीमागून चाकूने भोसकले. त्यात कैलास रस्त्यावरच कोसळले.

तेव्हा घटनास्थळावर आरोपी अजय यासही बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी कैलास यांना घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याठिकाणी मृत घोषित केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com