Chhatrapati sambhajinagar : कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी चिमुकल्याचा मृत्यू Chhatrapati sambhajinagar dog attack Injured toddler dies | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनराज पांडुरंग सरोदे

Chhatrapati sambhajinagar : कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी चिमुकल्याचा मृत्यू

शेंदूरवादा : कोडापूर (ता.गंगापूर) येथे २२ दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका साडे तीन वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना मात्र, मंगळवार (ता.१४) घडली.

धनराज पांडुरंग सरोदे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. धनराज आई, वडीलांसोबत शेतात गेला असता त्याच्यावर २० फेब्रुवारी रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवून चेहऱ्यावर चावा घेतला होता. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालय दाखल केले होते. त्याची प्रकृती खालावल्याने इतर खासगी रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, १४ मार्च रोजी धनराजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चिमुरड्या धनराजच्या मृत्युमुळे सरोदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून गावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.