आडुळ येथील मुख्यमंत्र्यांची नियोजित सभा देवगावला

शेख मुनाफ
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

महाजनादेश यात्रेनिमित्त आडुळ (ता.पैठण) येथील नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वागत सभा रद्द करुन देवगावला मंगळवारी (ता.27) सायंकाळी हाेणार आहे.

आडुळ (जि.औरंगाबाद) ः महाजनादेश यात्रेनिमित्त आडुळ (ता.पैठण) येथील नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वागत सभा रद्द करुन देवगावला मंगळवारी (ता.27) सायंकाळी हाेणार आहे. येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. तशी तयारी ही येथील भाजप कार्यकर्ते करीत असताना पक्ष अंतर्गत गटबाजीमुळे आडुळ येथील स्वागत सभा रद्द करुन धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव फाटा येथे करण्याचे ठरले आहे.

यानिमित्ताने भाजपमधील गटबाजी पाहायला मिळाली. मात्र यामुळे आडुळ बुद्रूक, आडुळ खुर्द, गेवराई, पारुंडी, पांढरी-पिंपळगाव, अब्दुल्लापुरसह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ यांचा मात्र हिरमोड झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Rally In Devgaon