चिकलठाणा धावपट्टीवर होणार कार्पेटिंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीवर (रनवे) कार्पेटिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे एअर इंडिया, ट्रूजेट, जेट एअरवेज या कंपन्यांनी रविवारपासून (ता. 26) वेळापत्रकात बदल केला आहे. महिनाभरात कार्पेटिंगचे हे काम सुरू होणार असल्याचे प्रभारी विमानतळ निदेशक शरद येवले यांनी सांगितले. 

औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीवर (रनवे) कार्पेटिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे एअर इंडिया, ट्रूजेट, जेट एअरवेज या कंपन्यांनी रविवारपासून (ता. 26) वेळापत्रकात बदल केला आहे. महिनाभरात कार्पेटिंगचे हे काम सुरू होणार असल्याचे प्रभारी विमानतळ निदेशक शरद येवले यांनी सांगितले. 

कार्पेटिंगच्या माध्यमातून धावपट्टी मजबुतीकरणाचे काम केले जाते. येथे 2009 नंतर आता कार्पेटिंगचे काम करण्यात येत आहे. हे काम ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यात धावपट्टीच्या लेअरवर लेअर टाकण्यात येतात. या धावपट्टीवरच विमानाचे लॅंडिंग होते. दिल्लीच्या मुख्य कार्यालयाकडून हे काम करण्यात येणार आहे. याविषयी टेंडरिंग प्रक्रिया पूर्ण झाली असून 26 मार्चपासून प्रत्यक्ष कामास सुरवात होणार होती. मात्र, आता हे काम महिनाभरात सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीचे टर्मिनल बिल्डिंगच्या उभारणीच्या वेळी रि-कार्पेटिंग करण्यात आले होते. त्यानंतर आता हे काम करण्यात येत असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ'ला दिली. आठ महिने चालणाऱ्या या कामामुळे विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या विमानांच्या वेळापत्रकात कंपन्यांनी बदल केला आहे. दुपारी लॅंडिंग होणारे विमान सायंकाळी पाचनंतर आता लॅंड होईल. दुपारी येणारे ट्रूजेटचे विमानही आता पाचनंतर येणार आहे. मात्र, सकाळी असलेल्या जेट एअरवेजच्या विमानाच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

चिकलठाणा विमानतळावर धावपट्टीच्या कार्पेटिंगचे काम होणार आहे. महिनाभरात या कामास सुरवात होईल. विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयातर्फे हे काम करण्यात येते. याचे टेंडर काढण्यात आले. आठ ते नऊ महिने हे काम चालणार आहे. 
- शरद येवले, प्रभारी विमानतळ निदेशक, चिकलठाणा विमानतळ 

वेळापत्रकातील बदल 
पूर्वी 
एअर इंडिया - दुपारी 3.35 लॅंडिंग व 4.10 ला टेकऑफ. 
आता 
सायंकाळी 5.10 लॅंडिंग व 5.40 ला टेकऑफ. 
तसेच दिल्लीला जाणारे एआय 441 याच्या वेळेत बदल झाला नाही. 

ट्रूजेट 
12.55 लॅंडिंग व 1.20 ला टेकऑफ. 
5 वाजता लॅंडिंग व 5.20 ला टेकऑफ 

जेट एअरवेज 
मुंबईहून सायंकाळी 5 वाजता लॅंडिंग व 5.50 ला टेकऑफ 
मुंबईहून येणाऱ्या सकाळच्या विमानाच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही. 

Web Title: chikalthan runway will be carpeting