चिकलठाणा विमानतळावर विमानाला अचानक आग

औरंगाबाद - विमानतळावर विमानाला आग लागल्याचे मॉकड्रील घेण्यात आले.
औरंगाबाद - विमानतळावर विमानाला आग लागल्याचे मॉकड्रील घेण्यात आले.

औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळावर विमानाला अचानक आग लागली. त्यामुळे सीआयएसएफ, पोलिस, अग्निशामक दल अशा सर्वच यंत्रणांची धावपळ सुरू झाली. ही घटना खरी नव्हती, तर ती चाचणी अर्थात मॉकड्रील होते. 

चिकलठाणा विमानतळावर बुधवारी (ता. सहा) मॉकड्रील घेण्यात आले. यामध्ये केंद्रीय सुरक्षा बल (सीआयएसएफ), विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल, एअरपोर्ट व्यवस्थापक, मनपा, पोलिस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सिग्मा हॉस्पिटल, धूत हॉस्पिटल येथील डॉक्‍टर, परिचारिका, रुग्णवाहिकांचा सहभाग होता. मॉक ड्रीलच्या माध्यमातून या सगळ्याची एखाद्या दुर्घटनेप्रसंगी कार्यक्षमता कशी असेल याचा अंदाज घेण्यात आला. यासाठी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मॉकड्रीलमध्ये सहभाग घेतला. विमान विमानतळावर उतरताना अपघातग्रस्त झाल्यानंतर लागलेल्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविणे, जखमींना विमानातून वेळीच बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे याचे प्रात्यक्षिक पाहून प्रत्येकाचा काळजाचा ठोका चुकावा अशी ही रंगीत तालीम करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com