री-कार्पेटिंग कामाला सुरवात; फ्लाईटच्या वेळापत्रकात बदल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

विमानतळावरील धावपट्टीचे होणार मजबुतीकरण, नोंव्हेबरपर्यंत चालणार काम
औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळावरील धावपट्टीचे (रनवे) री-कार्पेटिंग काम पंधरा दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे एअर इंडिया, ट्रूजेट, जेट एअरवेज या कंपन्यांनी 26 मार्चपासून त्यांच्या फ्लाईट वेळापत्रकात बदल केला आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

री-कार्पेटिंगच्या माध्यमातून धावपट्टी मजबुतीकरणाचे काम केले जाते. 2009 नंतर आता पुन्हा री-कार्पेटिंगचे काम करण्यात येत आहे. हे काम साधारणतः नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यात धावपट्टीवर लेअर टाकण्यात येतात. या धावपट्टीवरच विमानाचे लॅंडिंग होते. दिल्लीच्या मुख्य कार्यालयाकडून हे काम करण्यात येणार आहे. याविषयी टेंडरिंग प्रक्रिया पूर्ण होऊन, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याभरापासून धावपट्टी सर्व्हेचे काम करण्यात आले. 2 मेपासून कामाला सुरवात झाली.

चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीचे टर्मिनल बिल्डिंगच्या उभारणीच्या वेळी री-कार्पेटिंग करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा हे काम करण्यात येत आहे. हे काम आठ ते नऊ महिने चालते. या कामाच्या पार्श्‍वभूमीवर विमान कंपन्यांनी आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे.

असे आहे नवीन वेळापत्रक
- दुपारी लॅंडिंग होणारी फ्लाईट सायंकाळी पाचनंतर लॅंड होईल.
- दुपारी येणारी ट्रूजेटची फ्लाईट सायंकाळी पाचनंतर येणार आहे.
- सकाळी असलेल्या जेट एअरवेजच्या वेळेत कोणताही बदल नाही.

Web Title: chikalthana airport runway work start