आता परदेशी पाहुणे आणायची लाज वाटते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद - चिकलठाणा औद्योगिक वसाहतीला आता चाळीस वर्षे झाली. असे असले तरी या औद्योगिक वसाहतीत सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे  येथील कंपन्यांना पाहण्यासाठी परदेशी पाहुण्यांना चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत आणायची लाज वाटते, अशी व्यथा येथील उद्योजक मांडतात.

चार दशकांपूर्वी चिकलठाणा औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून औरंगाबादेत उद्योगांच्या पर्वाला सुरवात झाली. अद्यापही येथील उद्योगांना पायाभूत सुविधांसाठी भांडावे लागते. तरीदेखील काळानुसार येथील कारखान्यांनी कात टाकून विस्तार आणि विकास केला. गरजेपोटी अनेक देशांपर्यंत पोहच वाढविली.

मात्र, येथील बकाल अवस्थेपायी परदेशी ग्राहकांना चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत आणायची आता लाज वाटू लागली आहे, असे मासिआचे अध्यक्ष आणि चिकलठाण्यातील उद्योजक किशोर राठी सांगतात.येथील रस्ते अतिक्रमणे आणि पायाभूत सुविधांचा होत असलेला ऱ्हास हा वेदना देणारा ठरत आहे. त्यामुळे कारखाने बंद करून कुठेतरी अन्यत्र कामासाठी जागा पाहावी, असे वाटू लागल्याचे श्री. राठी सांगतात.

गप्पा, जोक आणि लॅपटॉप....
महापालिकेच्या अखत्यारीत असलेले रस्ते नीट नसल्याने परदेशी पाहुण्यांना औरंगाबादेत आल्यावर कंपनीत नेताना चांगलीच तारांबळ होते. रस्त्यांकडे त्यांचे लक्ष न जावे यासाठी अनेक नवे हतखंडे उद्योजकांनी तयार केले आहेत. अनेकदा गाडीच्या काचा चढवून घेत आलेल्या परदेशी ग्राहकाला गप्पांमध्ये गुंतवले जाते. त्यावर नाही भागले तर विनोदांचा आधार घ्यावा लागतो. यावरही नाही धकले तर व्यवसायासंबंधी चर्चा करण्यासाठी लॅपटॉपचा आधार घ्यावा लागतो, असेही राठी सांगतात.

देशाचा ब्रॅंड झाला, ग्राउंडवर काय काम?
पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या ताकदीचे सरकार निवडून आले, त्यामुळे आज भारताबाबात एक विश्वासार्हतेचे वातावरण तयार झाले आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला काय काम झाले, याचा शोध सरकारने घ्यावाच. आजही वीज गुल झाल्याचा फोन महावितरणला करायचा झाला तर कोणत्या डीपीतून आवाज आला, हे शोधून ठेवावे लागते, असेही श्री. राठी सांगतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chikalthana Industrial Colony Foreign Visitor