सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात मुलाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

सिल्लोड - येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोळा वर्षांच्या मुलाचा शुक्रवारी (ता. 24) सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे उपचारात कमतरता राहिल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाइकांनी मृतदेह शहर पोलिस ठाण्यात नेऊन संबंधित डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

पानवडोद खुर्द येथील संजय सूर्यवंशी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, की मुलगा बालाजी यास ताप आला असता त्यास गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी उपचार सुरू केले. रात्री नऊच्या सुमारास बदली डॉक्‍टरांनी उपचार सुरू ठेवले; परंतु मुलाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे डॉक्‍टरांनी त्यास औरंगाबाद येथे घेऊन जाण्याचे सांगितले. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे नाइलाजाने मुलास रिक्षाने स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथील डॉक्‍टरांनी मुलास तपासून मृत घोषित केले. दरम्यान, मृताच्या वडिलांनी आरोप केला आहे, की शासकीय रुग्णालयात मुलास वेळीच योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. पहाटे दोन वाजता औरंगाबाद येथे उपचारासाठी घेऊन जाण्याची वेळ टाकून नातेवाइकांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

""संबंधित डॉक्‍टरांकडून माहिती घेतली असता रुग्णाच्या उपचाराची कागदपत्रे पाहून त्यास योग्य उपचार दिले गेले आहेत. शुक्रवारी रात्री त्यास पुढील उपचारासाठी पत्र देण्यात आले होते; परंतु तक्रारदाराने रुग्णास वेळ असतानाही येथून पुढे नेले नाही.'' 
-डॉ. भूषणकुमार रामटेके, वैद्यकीय अधिकारी, सिल्लोड 

Web Title: child deaths in hospital