बंगाली पिंपळात रोखला पोलिसांनी बालविवाह 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

गेवराई - लग्नघरी लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, अवघ्या काही मिनिटांत विवाहाचा विधी पूर्ण होणार होता; मात्र पोलिसांनी ऐन विवाहाच्या वेळी येऊन तालुक्‍यातील बंगाली-पिंपळा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. 

चकलांबा पोलिसांना एका सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. 21) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऐन विवाहाप्रसंगी पोलिसांनी लग्न मंडपात येऊन हा विवाह थांबविला, त्यानंतर हा प्रकार वऱ्हाडी मंडळींसह ग्रामस्थांच्या लक्षात आला. यानंतर पोलिसांनी वऱ्हाडींचे समुपदेशन केल्यानंतर नातेवाइकांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. 

तालुक्‍यातील बंगाली-पिंपळा येथे एक शेतकरी कुटुंब वास्तव्यास आहे. अशिक्षित असणाऱ्या या कुटुंबातील एका अल्पवयीन युवतीचा विवाह शेवगाव (जि. नगर) तालुक्‍यातील गोळेगाव येथील एका मुलाशी ठरला होता. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विवाहाची सर्व तयारी झाली होती. दरम्यान, चकलांबा पोलिसांना बंगाली-पिंपळा येथे बालविवाह होत असल्याची माहिती एका सामाजिक संस्थेमार्फत मिळाली. त्यानंतर तत्काळ चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलिस उपनिरीक्षक एन. एम. शेख, पोलिस हवालदार परसराम मंजुळे, मुकुंद एकसिंगे, बी. डी. सानप, श्री. खताळ यांनी बंगाली-पिंपळा येथे धाव घेतली. त्यावेळी विवाहाला फक्त 15 ते 20 मिनिटांचा अवधी बाकी होता. तत्पूर्वी पोलिसांनी संबंधित बालविवाह थांबविला. यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलिस उपनिरीक्षक एन. एम. शेख यांनी वधू-वरांचे पालक व नातेवाइकांचे समुपदेशन केले. बालविवाह हा कायद्यानुसार गुन्हा असून, त्याचे दुष्परिणाम पोलिसांनी नातेवाइकांना समजावून सांगितले. पोलिसांच्या या भूमिकेमुळे मुलीच्या वडिलांनी विवाह न करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पोलिसांनी 18 वर्षांनंतर मुलीचा विवाह करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस दिली. 18 वर्षांपूर्वी मुलीचे लग्न करणार नाही, असे हमीपत्रदेखील पोलिसांनी लिहून घेतले. या घटनेची चकलांबा पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. 

Web Title: Child marriage stop