प्रवासात हरवलेली बालकं पालकांच्या स्वाधीन

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 28 एप्रिल 2018

नांदेड हुजूर साहेब रेल्वेस्थानकारून दररोज हजारो प्रवाशी ये- जा करतात. त्यात घाई गडबडीत अनेकांचे सामान तर काहींची लहाण बालक सुध्दा हरवतात. असाच प्रकार या शुक्रवारी ठिकाणी घडला. पालकांसोबत प्रवास करणाऱ्या तीन बालकांची ताटातूट झाली. स्थानकावर तिकीट तपासणीस मुकेशकुमार हे कार्यरत होते.

नांदेड : सध्या शाळांना उन्हाळी सुट्या सुरू झाल्याने आपल्या नातेवाईकांकडे जाणाऱ्या बालकांची संख्या मोठी आहे. पालकांसोबत प्रवास करताना हरवलेल्या तीन बालकांना कर्तव्यावर असलेल्या तिकीट तपासणीकांनी समयसुचकता दाखवत या तिन्ही बालकांना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. 

नांदेड हुजूर साहेब रेल्वेस्थानकारून दररोज हजारो प्रवाशी ये- जा करतात. त्यात घाई गडबडीत अनेकांचे सामान तर काहींची लहाण बालक सुध्दा हरवतात. असाच प्रकार या शुक्रवारी ठिकाणी घडला. पालकांसोबत प्रवास करणाऱ्या तीन बालकांची ताटातूट झाली. स्थानकावर तिकीट तपासणीस मुकेशकुमार हे कार्यरत होते. त्यांना शुक्रवारी (ता. २७) सायंकाळच्या दरम्यान फलाट क्रमांक एकवर वेगवेगळ्या ठिकाणी तीन बालकं रडत होते. त्यांना हे समजताच बालकांना ताब्यात घेऊन चौकशी कक्षात आणले. तेथून आपल्या स्पिकरवरून लगेच घोषणा केली.

त्यानंतर आपल्या पाल्यांचा शोध घेणारी मंडळी तिथे आली. विचारपुस करून व तपासणीअंती ही तिन्ही बालक त्यांच्या स्वाधीन केले. यात तिरूपती बालाजी गायकवाड (वय १२) रा. नागठाणा (खु) ता. उमरी, अमन शेख मुजीर आणि तुषार या तिन्ही बालकांना त्यांच्या पाल्यांच्या स्वाधीन केल्यानंतर पालकांच्या व बालकांच्या चेहऱ्यावर हसु फुलले होते. यावेळी रेल्वेचे मुकेशकुमार यांचे प्रवाशांनी अभिनंदन केले.  

Web Title: child missing in Nanded