आता लातुरातही रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा

सुशांत सांगवे
मंगळवार, 22 जानेवारी 2019

लातूर : बालकलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेतली जाणारी महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धा यंदापासून लातुरातही होणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभागी झालेले बालकलावंत शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पर्यावरणाचा ऱ्हास अशा मराठवाड्यातील ज्वलंत समस्यांकडे नाटकांच्या माध्यमातून लक्ष वेधून घेणार आहेत. त्यामुळे लातुरमधील पहिलीच स्पर्धा आगळी-वेगळी ठरणार आहे.

विद्यार्थ्यांमधील कलागुण फुलावेत म्हणून राज्य सरकार दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. वेगवेगळ्या शहरांत ही स्पर्धा घेतली जात होती. पण लातुरमधील केंद्राचा समावेश नव्हता. यंदापासून लातूर केंद्राचा समावेश झाला असल्याने १६वी महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धा लातुरात अायोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी २७ ते २९ जानेवारी दरम्यान दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक विभागाच्या संचालक स्वाती काळे आणि समन्वयक कोमल सोमारे यांनी दिली. यात प्रथम येणाऱ्या संघाला मुंबईत होणाऱ्या अंतिम फेरीत नाटक सादर करण्याची संधी मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

या तीन दिवसीय स्पर्धेत १६संघ सहभागी होत अाहेत. लातुरात प्रथमच ही स्पर्धा होत असली तरी शहरातील एकही संघ यात सहभागी झाला नाही. मात्र, ग्रामीण भागातील बालनाट्यांचा समावेश आहे. स्पर्धेतील बहुतांश विषय सामाजिक समस्यांवर आधारित अाहेत. ही नाटके तीनही दिवस दुपारी दोन ते रात्री आठ या वेळात प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

या नाटकांचा समावेश
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी (ता. 27) दारू पिऊन मेला गं माय (कार्ला), खरा वारीस (मोगरगा), डॉ. पडल्या बेड्या (कार्ला), स्वच्छ भारत (किल्लारी), अति तेथे माती (कार्ला) ही नाटके सादर होणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी (ता. 28) सावर गं उंच भरारी (वांगजिवाडी), केला अर्ज, मिळंना कर्ज (कार्ला), शिक्षणाचे महत्व (तांबाळा), शेतकरी तुका उपाशी (कार्ला), शौच्छालय बांधा दारोदारी, आरोग्य नांदेल घरोघरी (करजगाव), वंदे मातरम, वंदे मातरम मॉं (हासेगाव वाडी) ही नाटके पाहायला मिळतील. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी (ता. 29) मैतर जीवन (तळणी), आव्हान एक शेतकरी जीवन (चांदोरीवाडी), मी वसुंधरा बोलतेय (लिंबोळी), आरे मी बोलतोय (खलंग्री), मले बाजारात जायचे बाई (घनसरगाव) या नाटकांचे प्रयोग होतील.

Web Title: child play competition in latur