मुलाचे लैंगिक शोषण; महाराजाविरोधात गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

सतरा वर्षीय पीडित मुलाने काल (शनिवारी) अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नगर येथील 'चाइल्डलाइन' संस्थेच्या कार्यकर्त्यांना सर्व हकिगत सांगितली.

राजूर - अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून गर्दनी येथील एका महाराजाविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्यानुसार (पोक्‍सो) गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल रामचंद्र तळपे (रा. गर्दनी) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्यास आज अटक केली. 
याबाबत सतरा वर्षीय पीडित मुलाने काल (शनिवारी) अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नगर येथील 'चाइल्डलाइन' संस्थेच्या कार्यकर्त्यांना सर्व हकिगत सांगितली. त्यानंतर शासकीय यंत्रणा वेगाने फिरली. फिर्यादीनुसार, पीडित मुलगा अकोल्यातील एका सायबर कॅफेत काल संगणक परीक्षेसाठी प्रवेशपत्र काढण्यासाठी गेला होता. त्या वेळी आरोपी तळपे याने मुलाला त्याचे कार्यालय दाखविण्याच्या बहाण्याने नेले. कार्यालयातच त्याने त्याचे लैंगिक शोषण केले. मुलाला त्रास होऊ लागल्यानंतर त्याने हा प्रकार वडिलांना सांगितला. त्याच्या वडिलांनी 'चाइल्डलाइन' संस्थेला माहिती दिली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Child sexual abuse in rajur