भोकरदन तालुक्‍यात रोखला बालविवाह

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

जालना जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाणही अधिक आहे. भोकरदन तालुक्‍यातील एका गावात शनिवारी बालविवाह होत असल्याची माहिती 'लेक लाडकी' अभियानाच्या वर्षा देशपांडे यांनी पोलिसांना कळवली. 

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यातील एका गावात शनिवारी (ता. 21) होत असलेला बालविवाह 'लेक लाडकी' अभियानाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून थांबवला. राज्यभरात मुलींच्या जन्मदराचे सर्वात कमी प्रमाण असलेल्या जालना जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाणही अधिक आहे. भोकरदन तालुक्‍यातील एका गावात शनिवारी बालविवाह होत असल्याची माहिती 'लेक लाडकी' अभियानाच्या वर्षा देशपांडे यांनी पोलिसांना कळवली. 

मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत मुलीचे वडील, गावातील सरपंच, ग्रामसेवक या सर्वांना नोटीस बजावली. मुलगी सज्ञान होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असा जबाब नोंदवून घेण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी सांगितले. 

गावातील बालसंरक्षण समितीचे पदाधिकारी असलेल्या सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांनी असे प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना किंवा 'लेक लाडकी अभियाना'च्या सदस्यांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवून त्यांना कायद्याचे संरक्षण दिले जाईल. 

मुख्याध्यापक, शिक्षकांनीही मुलींचे निर्गम उतारे उपलब्ध करून ठेवावेत. पुढाऱ्यांनी अशा विवाहांना उपस्थित राहू नये; नाहीतर त्यांच्यावर अपात्र ठरविण्याची कारवाई केली जाईल, असे वर्षा देशपांडे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Child welfare prevented in Bhokardan taluka

टॅग्स