आई तुला मतदानाला जायचंय, जाशील न वं...

hingoli
hingoli

हिंगोली : आई, तुला मतदानाला जायचंय जाशील न वं, बाबा तुला मतदानाला जायचंय जाशील न वं अशी साद घालत डिग्रस कऱ्हाळे (ता. हिंगोली) येथील जिल्हा परिषदेतील विद्यार्थी आई, वडिलांकडे मतदानाचा हट्ट धरणार आहेत. शंभर टक्के मतदानासाठी यातून प्रयत्न केला जात आहे. 

हिंगोली विधानसभा मतदार संघात प्रत्येक गावातून शंभर टक्के मतदानासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जात आहेत. यामधे चुनाव पाठशाला उपक्रमांतर्गत शासकिय अधिकारी व कर्मचारी प्रत्येक गावांना भेटी देऊन लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. या शिवाय गावकऱ्यांना मतदानाचे महत्व पटवून देत आहेत. हिंगोली विधानसभा मतदार संघातील सर्वच गावांमधून उपविभागीय अधिकारी चोरमारे यांनी जनजागृती करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

दरम्यान, तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या 
विद्यार्थ्यांनीही मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्याचा 
निर्णय घेतला आहे. मुख्याध्यापक एकनाथ कऱ्हाळे यांच्यासह शिक्षकांनी प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यानंतर आता विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी जाऊन, आई, वडील, काका, काकू यांच्यासह प्रत्येक 
मतदाराला मतदान करण्यासाठी हट्ट धरण्याचा संकल्प यावेळी केला. 
त्यामुळे मुलांच्या बालहट्टा मुळे का होईना गावात शंभर टक्के मतदान होईल अशी अपेक्षा व्यक्त  होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com