esakal | पाल्याचे शिक्षण, बदलीबाबत तंत्रशिक्षण कर्मचारी आग्रही
sakal

बोलून बातमी शोधा

पाल्याचे शिक्षण, बदलीबाबत तंत्रशिक्षण कर्मचारी आग्रही

तंत्रशिक्षणमधील वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचे शिक्षण आणि बदली धोरणाविषयी आग्रही असून त्यांनी विविध मागण्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची भेट घेत निवेदन दिले. 

पाल्याचे शिक्षण, बदलीबाबत तंत्रशिक्षण कर्मचारी आग्रही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : तंत्रशिक्षणमधील वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचे शिक्षण आणि बदली धोरणाविषयी आग्रही असून त्यांनी विविध मागण्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची भेट घेत निवेदन दिले. 

शालेय विभागात कार्यरत वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सवलती मिळतात. त्याप्रकारे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनादेखील सवलती मिळाव्यात. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क भरणे कठीण जात आहे. यासाठी शासन निर्णय करावा. तसेच प्रवेशासाठी विशेष जागा निर्माण कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. 

गेल्या दोन वर्षामध्ये सहा वर्षातील वर्ग तीन कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्याबाबत अंमलबजावणी झालेली नाही. तरी आपापसातील बदल्या आणि रिक्त पदावरील विनंती बदल्यावर कार्यवाही करावी. तसेच कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि मानसिक विवंचनेतून बाहेर काढावे. बदली विषयक धोरणाचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांच्या सहा वर्षानंतर अधिनियमाच्या तरतुदीनुसार प्रशासकीय बदल्या करण्यात येतात. मात्र, वर्ग तीन कर्मचाऱ्यांची बदली जिल्ह्याबाहेर शक्‍यतो करण्यात येऊ नये. 

तंत्रशिक्षण विभागात पाच वर्षापासून विभागीय क्रीडा झाल्या. गेल्यावर्षी याठिकाणी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा झाली. ती कायम करावी. त्यासाठी शासनाकडून निधी मिळावा, अशा मागण्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रधान सचिवांकडे केल्या. यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. बी. कर्पे, सचिव एन. आर. भोसले, शेखर कांबळे, विजय शृंगारे, सुदाम दिवटे, लक्ष्मण मामडे, रमेश डोईफोडे, सुनील पवार आदींचा समावेश होता.

loading image
go to top