चिमुरड्यांसाठी आजीच बनली आई

Childrens-Day-Special
Childrens-Day-Special

औसा - बारा दिवसांची असतानाच आईचे निधन झाले. आई काय असते हे कळण्यापूर्वीच आईला गमावणाऱ्या मेहर आणि फातिमासाठी तिची आजी मेहरूनबी हीच आई आहे. गरीब परिस्थिती असताना दोन नातींची जबाबदारी मेहरूनबी यांच्यावर येऊन पडली आहे. मोलमजुरी करून त्या त्यांच्या लाडक्‍या नातींचा सांभाळ करीत आहेत. 

साठ वर्षांच्या मेहरूनबी शेख औसा शहरातील संजयनगरमध्ये तीन पत्र्यांच्या लहानशा घरात राहतात. पती गुलाब शेख हे हमाली करायचे; परंतु आता वय झाल्यामुळे तेही घरीच बसून असतात. त्यांच्या मुलाला पहिली मुलगी होती. ती एक वर्षाची असतानाच दुसरी मुलगी झाली. या बाळंतपणात सुनेचे निधन झाले. मुलगा हमाली करतो; पण त्याच्या कमाईवर त्याचाही खर्च भागत नाही. त्यामुळे मेहरूनबी यांनी दोन्ही मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली.

थोरली मुलगी मेहेर एक वर्षाची, तर फातिमा अवघी बारा दिवसांची होती. घरात रोज काम केल्याशिवाय चूल पेटत नाही. त्यात या दोन्ही मुलींना दूध पाहिजे होते. दोन लहान मुली घेऊन रोजगार तरी कसा मिळेल, काम करताना बाळांकडे कोण लक्ष देईल, असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर होते. त्यांनी शेतात मोलमजुरी करायला सुरवात केली. कधी कधी लहान फातिमा टाहो फोडायची तेव्हा शेतमालकालाच दया येऊन काम सोडून तिला घेण्यास ते सांगत. वयाच्या साठाव्या वर्षी दोन नातींना जगविण्यासाठी मेहरूनबी काबाडकष्ट करीत आहेत. या लेकरांसाठीच परमेश्‍वराने या वयातही काबाडकष्ट करण्याची ताकद दिली. मी आहे तोपर्यंत या मुलींना पाहीन, पण माझ्यानंतर काय, या विचारानेच मन सुन्न होत असल्याचे मेहरूनबी सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com