सीआयडी कार्यालयच डीवायएसपीविना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

नांदेड सीआयडी (CID) क्राईममध्ये डीवायएसपींची पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील काही महत्वाचे तपास बाहेर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे सोपवावे लागत आहेत. तपासातील अत्यंत महत्वाचा दुवा म्हणून सीआयडीकडे पाहिल्या जाते. 
राज्य शासनाने या मध्ये लक्ष्य घालण्याची गरज आहे.

नांदेड : नांदेड सीआयडी (CID) क्राईममध्ये डीवायएसपींची पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील काही महत्वाचे तपास बाहेर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे सोपवावे लागत आहेत. तपासातील अत्यंत महत्वाचा दुवा म्हणून सीआयडीकडे पाहिल्या जाते. 
राज्य शासनाने या मध्ये लक्ष्य घालण्याची गरज आहे.

नियमीत पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी यांना या ठिकाणी एक टप्पा पदोन्नती देऊन पोलिस उपाधिक्षक या पदावर पाठविले जाते.  मात्र तरी पण या विभागात बदलून येण्यास पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी ईच्छुक नसतात. ते पोलीस स्टेशनमध्ये काम करण्यासाठी ईच्छुक असतात. आणि त्याप्रमाणे शासन दरबारी प्रयत्नशील असतात. कारण या विभागात नेहमी महत्वाचे तपास दिले जातात आणि पोलिस अधिक्षक, पोलिस महानिरीक्षक, विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अतिरिक्त पोलिस महासंचालक अश्या मोठ्या पदाच्या अधिकाऱ्यासमोर बसून तपासात काय केले हे सांगावे लागते. अशी हजेरी कोणाला नको आहे, म्हणून या विभागाकडे बदलून येण्यास कोणी इच्छुक दिसत नाही.

परंतु, या विभागातील 100 टक्के जागा भरण्याची गरज आहे. जागा रिक्त असल्यामुळे या विभागातील तपासावर परिणाम होत आहे. तरी शासनाने या विभागातील जागा त्वरीत भराव्यात असी मागणीही पुढे येत आहेत. नांदेड सीआयडी कार्यालयात या दोन डीवायएसपी बदलून गेले तेंव्हापासून या दोन्ही जागा रिक्त आहेत. तसेच या ठिकाणी एक पोलिस निरीक्षक रिक्त असल्याने अनेक किचकट व गंभीर गुन्ह्यांचा तपास थंड बस्त्यात पडला आहे.

राज्यभर गाजत असलेल्या डमी परिक्षार्थी प्रकरणाचा तपास याच कार्यालयाकडे आहे. तत्कालीन पोलिस अधिक्षक संकर केंगार यांनी विशेष लक्ष घालून अनेक डमी परिक्षार्थींना अटक केली. त्यानंतर जिल्ह्यात तत्कालीन पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी धान्य घोटाळा उघडकीस आणला. हा तपास राज्य सारकारने सीआयडीकडे वर्ग केला. नांदेड या ठिकाणी पोलिस उपाधिक्षक हे पद भरले असते तर जालना सीआयडीकडे तपास गेला नसता. असेही सुज्ञ नागिरक बोलत आहेत.

Web Title: CID office are without DYSP in nanded