बक्षीस लागल्याची थाप मारून महिलेची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

औरंगाबाद - इंडिया शॉप बाजार कंपनीच्या प्रतिनिधींनी महिलेला बक्षीस लागल्याचे सांगत 53 हजार पाचशे पन्नास रुपयांना गंडवले. ही घटना दहा जानेवारी ते वीस फेब्रुवारीदरम्यान घडली.

औरंगाबाद - इंडिया शॉप बाजार कंपनीच्या प्रतिनिधींनी महिलेला बक्षीस लागल्याचे सांगत 53 हजार पाचशे पन्नास रुपयांना गंडवले. ही घटना दहा जानेवारी ते वीस फेब्रुवारीदरम्यान घडली.

फातिमा बेगम शेख इलियास (वय 30, रा. बारी कॉलनी) यांनी तक्रार दिली, की त्यांना इंडिया शॉप बाजारच्या प्रतीक्षा, श्रद्धा, दिलीप, परवेज या चौघांनी मला 75 हजारांचे बक्षीस लागल्याचे सांगितले. दहा जानेवारी ते वीस फेब्रुवारीदरम्यान वेबसाईटवर जाऊन इनटेक्‍स कोड ट्रेड कंपनीचा वापर करून टप्प्याटप्प्याने पैसे घेतले. एकूण 53 हजार पाचशे पन्नास रुपये घेऊनही परत चौघे पैसे मागत असल्याने फातिमा बेग यांना संशय आला. त्यांनी चौकशी केली असता, चौघांनी फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणात त्यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, संशयित चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: Cime news of Marathawada