चित्रपटगृहात गोंधळ घालणाऱ्यांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

नांदेड : आपल्या आसनावर बसण्यासाठी जाणाऱ्या युवकाचा पाय दुसऱ्या युवकाला लागल्याने व पाणी पाऊचे पाणी उडल्याने दोघांत हाणामारी झाली. यानंतर एका गटाने आपल्या मित्रांमार्फत हल्ला चढवत चित्रपटगृहाची तोडफोड केली. तोडफोड व हाणामारी करणाऱ्या दहा जणांना अटक केली. त्यांना सोमवारी (ता. ३१) न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात गोपालसिंह बिसेन यांच्या मालकीची शाम चित्रपटगृह आहे. परंतु ही टॉकीज रिलायन्स कंपनी चालविते. या चित्रपटगृहात रणबीरसिंग यांचा 'सींबा' चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या युवकांत पाय लागल्याच्या कारणावरून हाणामारी झाली. यावेळी एका युवकाने आपल्या मित्रांना बोलावून घेतले. यावेळी आलेल्या मित्रांनी लोखंडी रॉड व दगडांनी चित्रपटगृहाची तोडफोड केली. तसेच आतमध्ये जाऊन दुसऱ्या गटातील युवकांना मारहाण केली. यानंतर चित्रपटगृहात एकच गोंधळ उडाला. हे वृत्त वजिराबाद पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले.

हाणामारी, दहशत पसरवून चित्रपटाची तोडफोड करणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले. यावेळी दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचा 'प्रसाद' दिला. रात्री उशिरा व्यवस्थापक संजयसिंह विठ्ठलसिंह ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी अटक दहा आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पोलिस कोठडीत पाठविले. 

हे आहेत आरोपी...

सुनील चिमनाजी वाघमारे (वय १९), गोविंद मरिबा मेटकर (वय २०), आकाश मरिबा मेटकर (वय १९) सर्व राहणार चिखलवाडी, फैयाज जमील मिर्झा (वय २३), सफीउल्ला समीउल्लाखान (वय १९), इलीयास जमील मर्झा (वय २५), जावेद व युसूफ सर्व राहणार श्रावस्तीनगर आणि शेख सलमान शेख सलीम (वय १९) व मॅक्सी उर्फ मॅक्स रा. लालवाडी यांचा समावेश आहे.    

Web Title: Cinema Theater Misbehave Police Custody to Some Peoples