उस्मानाबादेत नागरीक करतील थेट मोबाईवरुन तक्रार

Citizens of Osmanabad will send complaints directly from mobile
Citizens of Osmanabad will send complaints directly from mobile

उस्मानाबाद - शहरातील सात हजार नवीन एलईडी पथदिव्यांचे काम पूर्ण झाले असून, दिवा बंद पडला तर नागरिकांना थेट मोबाईलवर तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ७२ तासांत दिवा पुन्हा लागला नाही, तर त्याठिकाणचे बिल अदा करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील संपूर्ण रस्ते आता एलईडी पथदिव्यांनी उजळणार आहेत.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये पालिकेने मराठवाड्यात पहिला क्रमांक पटकावून यश मिळवले. यातूनच शहरातील पथदिव्यांचा प्रश्नही कायमस्वरुपी निकाली काढण्यात पालिकेला यश आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण रस्त्यावर एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरू होते. केंद्र शासनाच्या योजनेतून हे काम केले जात होते. बहुतांश भागातील पथदिव्यांचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान पथदिव्यांची ही यंत्रणा आता अद्ययावत केली जात आहे. पथदिवे बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पथदिवे दररोज सुरु-बंद करण्याची जबाबदारी कंत्राटदाराला देण्यात आली आहे. एखाद्या भागातील पथदिवे बंद असतील तर नागरिकांना त्वरित तक्रार करता येणार आहे. यासाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ७२ तासांत तक्रारींची निपटारा होणे अपेक्षित आहे. बंद पथदिवा सुरू न झाल्यास संबंधित ठेकेदारावर बिलाची जबाबदारी देण्यात आली आहे. शहरातील एकूण पथदिवे बंद असलेल्या सर्वांचे बिल कंत्राटदाराला द्यावे लागणार आहे. गेली अनेक वर्षे नागरिकांना बंद पथदिवे सुरू करण्यासाठी नगरसेवकाकडे जावे लागत होते तर काही नागरिक पालिकेत चकरा मारीत होते. आता मात्र नागरिकांचा हा त्रास कमी होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

शहराच्या संपूर्ण भागातील पथदिव्याचे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी मीटर नसल्याने काम राहिले आहे. अशा ठिकाणी केबल उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यानंतर या संपूर्ण सेवेचे अद्यावतीकरण करून दिले जाणार आहे. नागरिकांना बंद पथदिव्यांची तक्रार मोबाईलद्वारे करता येणार आहे. - बाबासाहेब मनोहरे, मुख्याधिकारी, उस्मानाबाद पालिका

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com