भर पावसाळ्याच्या दिवसांत परभणीत पाणीबाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

परभणी : यंदा पावसाने ओढ दिल्याने भर पावसाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात पाणीबाणी सुरु आहे. आषाढ महिन्यात पाणीटंचाई मात्र गंभीर झाल्याने 55 गावे आणि 14 वाड्यातील 1 लाख 74 हजार 677 लोकसंख्येला 69 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर टॅंकरसह अन्य गावातील पाणीपुरवठा करण्यासाठी 371 गावातील 433 खाजगी विहीरींचे अधिग्रहण केले आहे. जुलै महिण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅंकर सुरु ठेवण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे.

जिल्ह्यातील यंदा भयावह पाणीटंचाई आहे.भयंकर दुष्काळामुळे पाणीबाणी सुरु आहे. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात टंचाई जानवत आहे. मार्चपासून जिल्ह्यात टॅंकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहीरींची पाणीपातळी घटल्याने  त्या गावात पाणीटंचाई सुरु झाली आहे. पाणी टंचाई निवारणासाठी विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरवर्षी 30 जून अखेर टॅंकर बंद करण्यात येतात. जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या अठवड्यात पावसाची हजेरी राहते. त्यामुळे बहुतांष गावात पाण्याचे स्त्रोत जिवंत होतात. त्यामुळे टॅंकरची अवश्यकता राहत नसल्याने जून अखेर सर्व टॅंकर बंद करण्यात केले जातात. यंदा मात्र जुले उजाडला तरी पाऊस पडत नसल्याने राज्य शासनाने पाऊस पडेपर्यंत टॅंकर सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

परभणी तालुक्यात पाच गावात तीन,पालम तालुक्यातील नऊ गावे आणि सहा वाड्यात 17,पूर्णा तालुक्यातील 10 गावात 12,गंगाखेडमधील 7 गावे आणि 5 वाड्यात 12,सोनपेठ तालुक्यात 3 गावात तीन, पाथरी तालुक्यात तीन तांड्यावर एक,सेलू तालुक्यात 5 गावात 5,जिंतूर तालुक्यात 10 गावात 10, मानवत तालुक्यात 6 गावात 6 असे टॅंकर सुरु आहेत.तर विहीरी विहीर अधिग्रहण असे परभणी- 7, पालम-73, पूर्णा-35, गंगाखेड-120, सोनपेठ-25, सेलू- 50, पाथरी-12, जिंतूर-86, मानवत-15

एकूण 433 विहीरींचे अधिग्रहण केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens of Parbhane faces problem of water scarcity