पैनगंगा नदी मार्गे विदर्भवीरांचे आगमन

painganga.jpg
painganga.jpg


वाई बाजार, (ता.माहूर जि. नांदेड) ः राज्यभर कोरोना संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांची दररोज भर पडत असताना नांदेड जिल्ह्यात मात्र एकही रुग्णवाढ नसल्याने ग्रीन झोन घोषित करण्यात आले होते. परंतु, मागील आठवडाभरात नांदेड येथील दोन रुग्णांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने पहिल्यापेक्षा अधिक सतर्क होऊन फिजिकल डिस्टन्सचा पाया अधिक मजबूत केला आहे. तर शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यात रुग्ण संख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ चिंतेत अधिकच भर पाडणारी असून यवतमाळ जिल्ह्यामधून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या प्रमुख राज्य व राष्ट्रीय महामार्गावर तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले खरे, परंतु दोन जिल्ह्यांच्या मध्यभागी वाहनाऱ्या पैनगंगा नदीतून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर तालुक्यातील मोठ्या बाजारपेठ असलेल्या वाई बाजार, सारखणी व मांडवी येथे दिवसरात्र बिनदिक्कतपणे अगदी किरकोळ वस्तू खरेदी करण्यासाठीदेखील आवागमन करीत असल्याने यवतमाळच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातदेखील कोरोना आजाराचा फैलाव झपाट्याने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नांदेड जिल्हा प्रशासनाने यवतमाळ जिल्ह्यांमधून येणाऱ्या धनोडा-केरोळी व सायफळ-उनकेश्वर या ठिकाणी तपासणी नाके कार्यान्वित करून अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी विदर्भ सीमेपलीकडून येणाऱ्यांना मज्जाव केला आहे. दोन तपासणी नाक्यांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असल्याने परवानगी असल्याखेरीज नांदेड जिल्ह्यात येण्याची हिम्मत कोणी करत नाही. परंतु, याहीपेक्षा सोपे असलेले व जिल्हा सीमा ओलांडण्यासाठी अंतराने कमी असलेल्या कुपटी, हडसणी, जुनी टाकळी, जुनेनेर, पडसा, गोकुळ, सायफळ, मदनापूर, रामपूर व खंबाळा आदी मार्गावरून यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार, आर्णी, सदोबा सावळी, केळझरा, तडसावळी, पारवा व पांढरकवडा येथून किराणामाल, पानटपरीसाठी जर्दा, गुटखा, तंबाखू, सुपारी शेतउपयोगी साहित्य बी-बियाणे, खत, शेती मशागतीकरिता ट्रॅक्टरचे साहित्य, अवजारे खरेदी करण्यासाठी माहूर तालुक्यातील वाई बाजार व किनवट तालुक्यातील सारखणी, मांडवी येथे पोलिस व प्रशासनाच्या नजरेत धूळफेक करून निष्काळजीपणे येणे-जाणे करताहेत.

कोरोना फोर्सची गत तंटामुक्त समिती सारखी होऊ नये
प्रशासनाने अगदी छोट्या छोट्या खेडेगावांत तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस पाटील सचिव असलेल्या अँटी कोरोना फोर्सची स्थापना करून गावाचे सीमा सुरक्षित करून फिजिकल डिस्टन्सचे नियम तंतोतंत पाळले जावेत, असे दंडक ठेवून गावातील सरपंच, कोतवाल, तंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्रामसेवक, कृषी सहायक व एनजीओ, एनएसएस आणि एनसीसी चे प्रतिनिधी स्वयंसेवक म्हणून समाविष्ट करून समित्या गठित केल्या आहेत. चांगला हेतू असलेल्या या समितीला तंटामुक्त ग्राम समितीच्या वादातीत तंट्यासारखे ग्रहण लागू नये म्हणजे जेणेकरून ज्या उद्देशासाठी या समित्या निर्माण करण्यात आले आहे. तो उद्देश सकारात्मकरीत्या फळाला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com