वाटाघाटीनंतर घटविल्या शहर बसच्या किमती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

औरंगाबाद  - स्मार्ट सिटीअंतर्गत शंभर बस खरेदीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून, टाटा कंपनीसोबत वाटाघाटी केल्यानंतर कंपनीने प्रत्येक बसमागे २५ हजार रुपये दर कमी करण्याचे आश्‍वासन महापालिकेला दिले आहे.

त्यानुसार २५ लाख रुपये वाचणार आहेत. महापालिकेने दराबाबत संमतिपत्र दिल्यानंतर पुढील दीड महिन्यात पहिली मॉडेल बस महापालिकेला मिळेल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी (ता.१८) सांगितले. 

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने बस खरेदीसाठी मंजुरी दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात शंभर बस खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. तीनही वेळा एकमेव टाटा कंपनीने निविदा भरली. कंपनीने प्रती बस ३६ लाख ६५ हजार रुपये एवढा दर भरला होता. मात्र, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी (ता.१७) अंतिम वाटाघाटीसाठी कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यात कंपनीने बसच्या दरात २५ हजार रुपये कमी करण्याचे मान्य केले. त्यामुळे आता ही बस ३६ लाख ४० हजार रुपयांत मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेची २५ लाख रुपयांची बचत होणार आहे. कार्यारंभ आदेश देण्यासासाठी किमान महिनाभराचा अवधी लागणार असून, दर कराराबाबत संमतिपत्र दिल्यानंतर दीड महिन्यात कंपनी मॉडेल बस तयार करेल, त्यानंतर कंपनीकडून त्यानंतर तीन महिन्यांत पहिल्या टप्प्यातील ३० बस मिळतील. दुसऱ्या टप्प्यात ३० आणि तिसऱ्या टप्प्यात ४० बस महापालिकेला मिळणार आहेत.

सहा महिने राहणार महामंडळाकडे ताबा 
दिवाळीपर्यंत महापालिकेला पहिल्या टप्प्यातील बस मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर सहा महिने या बस एसटी महामंडळाच्या ताब्यात देण्यात येतील. त्यासाठी आयुक्तांनी पत्रव्यवहार केला आहे. तसेच बससेवेचे नियोजन आणि देखरेखीसाठी महापालिकास्तरावर परिवहन समिती स्थापन केली जाईल. त्यासाठीचा प्रस्ताव आयुक्‍त सादर करतील. सहा महिन्यांच्या काळात बससेवा चालविण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Web Title: City Bus Purchasing rate Final