शहरात पुन्हा आले 197 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - नोटाबंदीच्या निर्णयानंतर नवव्या दिवशी बॅंकांमध्ये कॅश काढण्यासाठी रांगा कमी झाल्या असल्या तरी जुन्या, हजार पाचशेच्या नोटा जमा करण्यासाठी रांगा अद्यापही कायम आहेत. तर दुसरीकडे शहरात दोन ते तीन खासगी बॅंकांचे एटीएम सोडले तर दिवसभर कोणतेही एटीएम सुरू न झाल्याने नागरिकांचे हाल कायम आहेत. शहरात 112 कोटी रुपये आल्यानंतर गुरुवारी (ता. 17) सायंकाळी दूध डेअरीजवळील स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये 197 कोटी रुपये आले होते. आता मागणी नोंदविणाऱ्या बॅंकांना ही रक्कम दिली जाणार आहे. 

कोट्यवधी रुपये आले 

शहरात आलेल्या 112 कोटी रुपयांमध्ये एसबीएच सिल्लोड शाखा 22 कोटी, एसबीएच शहागंज 23 कोटी, आयडीबीआय 22 कोटी रुपये वितरित केले जातील. या तीन बॅंकांना 67 कोटी रुपये दिले जाणार होते. आता शहरात पुन्हा गुरुवारी सायंकाळी 197 कोटी रुपये आले आहेत. मात्र, यात अजून बॅंकांनी मागणी नोंदविली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील पैसे बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाला दिले जाण्याची शक्‍यता आहे. यासाठी आणखी काही बॅंका कॅशची मागणी नोंदविणार आहेत. 

बॅंकांतील गर्दी कमी होईना 

शहरातील काही बॅंका वगळता बहुतांश बॅंकांमध्ये गर्दी कायम होती. 10 नोव्हेंबरपासून नागरिक बॅंकांसमोर रांगा लावून उभे आहेत. मात्र बहुतांश बॅंका दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खातेदारांना देत नाहीत. अपवादात्मक स्थितीत वीस हजारांची रक्कम देतात. सध्या बॅंकांमध्ये पैसे काढण्यापेक्षा पैसे जमा करण्यासाठी जास्त रांग दिसते. लोक आपल्याकडील जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा जमा करत आहेत. त्यामुळे गर्दी कायम आहे. ज्या बॅंकांनी जास्त काउंटर सुरु केले होते त्यांच्याकडील गर्दी कमी झाली होती. 

काही बॅंकांमधील कॅश संपली 

बॅंकांकडे पुरेशी रक्कम नसल्याने अनेक बॅंकांची कॅश दुपारी संपली होती. त्यामुळे अनेक खातेदारांना रिकाम्या हाताने परतावे लागले. मात्र या बॅंकांमध्ये जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा जमा करुन घेण्यात येत होत्या. 

जेथे खाते तेथेच रक्कम द्या 

अनेक जणांचे विविध बॅंकांच्या शाखांमधील खाते आहे. नियमानुसार बॅंकेच्या कोणत्याही शाखेतून आपल्या खात्यात रक्कम जमा करता येते. मात्र, गर्दी जास्त असल्याने अनेक बॅंका ज्या शाखेत खाते आहे तेथे पैसे जमा करा, असे सांगत आहेत. बळिराम पाटील शाळेजवळील स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखेत एकजण पैसे जमा करण्यासाठी आला होता. त्याचे खाते शहागंज येथील बॅंकेत होते. त्यामुळे येथील शाखेने त्याचे पैसे स्वीकारले नाहीत. 

बोटांवर शाई 

जे खातेदार जुन्या नोटांच्या बदल्यात नोटा घेत होते त्यांच्या बोटाला गुरुवारपासून (ता.17) बॅंकांनी शाई लावण्यास सुरवात केली आहे. स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये खातेदारांना अशी शाई लावण्यात आली होती. त्यामुळे वारंवार पैसे बदलण्यासाठी एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत उड्या मारणाऱ्यांना लगाम बसणार आहे.

Web Title: The city was again 197 million