कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक वैतागले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

औरंगाबाद - महापालिका पाणीपुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार आणि वारंवार जलवाहिन्या फुटत असल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. महापालिकेने निर्माण केलेल्या पाणीटंचाईला नागरिक वैतागले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांनाही या विषयावर चर्चा करायची आहे. त्यासाठी सर्वधारण सभेचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी सभागृहनेते गजानन मनगटे यांनी पत्राद्वारे महापौर भगवान घडमोडे यांच्याकडे केली आहे. 

गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा समांतर जलवाहिनी प्रकल्प राबविणाऱ्या सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे होता. तेव्हा शहरवासीयांना पाणीटंचाईचे चटके बसले नाहीत. यंदा मात्र शहराचा पाणीपुरवठा महापालिका प्रशासनाकडे असताना कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. सात मार्चला जायकवाडी ते शहरापर्यंच्या जलवाहिनीवरील 34 गळत्या दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने 24 तासांचा शटडाऊन घेतला; मात्र नंतरच्या दिवसांत पाणीपुरवठा विस्कळित राहिला. 

एप्रिल महिन्यातही आतापर्यंत किमान तीनवेळा जलवाहिनी गळती लागल्याने पाणीपुरवठा विस्कळित झालेला आहे. आता या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला स्थायी समिती सदस्य सीताराम सुरे, रावसाहेब आमले, मकरंद कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले.

Web Title: civil vaitagale by artificial water shortage