वैद्यकीय अधिकाऱ्याला पोलिसांची मारहाण, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

लसीकरणासाठी आलेल्या नागरिक परतावे लागले माघारी
corona vaccination
corona vaccinationcorona vaccination

आष्टी (बीड): तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल वनवे यांना पोलिसांनी केलेल्या अमानुषपणे मारहाणीमुळे गुरुवारी (ता.६) आष्टी (ashti) तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी (front line workers) काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केले. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार राजाभाऊ कदम यांना दिले. दरम्यान लस (corona vaccination) घेण्यासाठी खेड्यापाड्यातून मध्यरात्रीपासून आलेल्या शेकडो नागरिकांनी लसीकरण न झाल्याने परत फिरावे लागले.

डॉ. विशाल वनवे हे बीड येथून आष्टीकडे येत असताना चऱ्हाटा फाटा येथे बुधवारी (ता.५) सायंकाळी काही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. मारहाण करणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आष्टी तालुक्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता.६) कामबंद आंदोलन केले. सकाळी ११ वाजता आष्टी येथील रुग्णालयात सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आष्टी ते तहसील कार्यालयावर काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढला.

corona vaccination
अंत्यविधी केलेला मृतदेह काढला बाहेर! मृतदेहाची अदलाबदल झाल्याने नातेवाईकांना नाहक त्रास

यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद वाघ, डॉ.दत्ता जोगदंड, डॉ.दीपक शेळके, डॉ.सचिन पाळवदे, डॉ. नितीन राऊत, डॉ.नारायण वायभासे आदी उपस्थित होते. तर एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले तर दुसरीकडे तालुक्यातील पन्नास ते साठ गावांतील नागरिकांनी लस मिळावी यासाठी तालुक्यातील सुलेमान देवळा व खुंटेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मध्यरात्री पासूनच रांग लावली होती. परंतु सकाळी आठ वाजता लसीकरण होणार नाही अशी माहिती मिळाल्यानंतर नागरिकांचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. तर आ. सुरेश धस यांनी मारहाण करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल वनवे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com