हिंगोली: शिरडशहापूर येथे दोन गटात वाद; वातावरण तणावपूर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

या ठिकाणी असलेल्या ध्वजाच्या बाजूला घाण होत असल्यामुळे येथे तार कुंपण लावण्याचा निर्णय एका गटाने घेतला होता. मात्र त्या कामास दुसऱ्या गटाने विरोध केल्यामुळे वादाला तोंड फुटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून गावात धुसफूस सुरु होती. मात्र आज दोन्हीकडील जमाव एकत्र आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे ध्वजास कुंपन लावण्याच्या कारणावरुन आज सकाळी दोन गटात वादाला तोंड फुटले. दोन्ही बाजूकडील जमाव एकत्र आल्यामुळे वातावरण तणावपूर्ण आहे. 

या ठिकाणी असलेल्या ध्वजाच्या बाजूला घाण होत असल्यामुळे येथे तार कुंपण लावण्याचा निर्णय एका गटाने घेतला होता. मात्र त्या कामास दुसऱ्या गटाने विरोध केल्यामुळे वादाला तोंड फुटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून गावात धुसफूस सुरु होती. मात्र आज दोन्हीकडील जमाव एकत्र आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

घटनास्थळी कुरुंदा पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. शांतता राखण्यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांच्या बैठका सुरु केल्या आहेत.

Web Title: clash between two groups in Hingoli

टॅग्स