क्‍लासचालक खूनप्रकरणी सहा जणांना न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

लातूर - येथील "स्टेप बाय स्टेप क्‍लासेस'चे चालक अविनाश चव्हाण खून प्रकरणातील सहाही संशयित आरोपींना न्यायालयाने 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश मंगळवारी दिला.

लातूर - येथील "स्टेप बाय स्टेप क्‍लासेस'चे चालक अविनाश चव्हाण खून प्रकरणातील सहाही संशयित आरोपींना न्यायालयाने 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश मंगळवारी दिला.

अविनाश चव्हाण यांचा 25 जूनला गोळी झाडून खून झाला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांचा एकेकाळचा भागीदार प्रा. चंदनकुमार शर्मा हा मास्टरमाइंड निघाला होता. पोलिसांनी प्रा. चंदनकुमार शर्मासह महेंद्रचंद्र बोगडे, शरद घुमे, करण गहिरवार, अक्षय शेंडगे यांना अटक केली होती.

त्यानंतर पिस्तूल पुरविणाऱ्या रमेश मुंडे यालाही केजमधून अटक केली. सहाही संशयितांना दहा जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. आज त्यांना न्यायालयासमोर पुन्हा उभे करण्यात आले.

Web Title: class owner murder case 6 people custody crime court