क्‍लीनर ते करोडपती!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

औरंगाबाद - धुळे येथे साधा क्‍लीनर असलेल्या एका तरुणाने चालक बनून नंतर ट्रकच्या धंद्यात पाय रोवत हेराफेरीला सुरवात केली. त्यात यश आल्यानंतर अनेकजणांना या धंद्यात आणून तो ट्रक फसवणुकीच्या धंद्यात मास्टर बनला आणि यातून या टोळीने कोट्यवधींची माया कमावली. त्याने आतापर्यंत सुमारे ३५ ट्रक विकल्याची बाब समोर आली आहे. 

औरंगाबाद - धुळे येथे साधा क्‍लीनर असलेल्या एका तरुणाने चालक बनून नंतर ट्रकच्या धंद्यात पाय रोवत हेराफेरीला सुरवात केली. त्यात यश आल्यानंतर अनेकजणांना या धंद्यात आणून तो ट्रक फसवणुकीच्या धंद्यात मास्टर बनला आणि यातून या टोळीने कोट्यवधींची माया कमावली. त्याने आतापर्यंत सुमारे ३५ ट्रक विकल्याची बाब समोर आली आहे. 

ट्रक चोरी, फसवणूक प्रकरण उजेडात आल्यानंतर शेख बाबर याला औरंगाबादेतील गुन्हेशाखा व एमआयएमचा नगरसेवक शेख जफर याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आणखी दोघांना मंगळवारी (ता. आठ) अटक झाल्यानंतर रात्रीतून एका संशयिताला औरंगाबाद गुन्हे शाखा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चोरी करून तसेच गंडवून ट्रक चेसिस क्रमांक बदलून पुन्हा नव्याने ट्रक विक्री केले जात होते. यात जावेद मनियार मुख्य सूत्रधार असून, त्याला गुरुप्रितसिंग नामक एका गॅरेजमालकाची साथ होती. दोघेही पसार आहेत. औरंगाबाद, धुळेशी संबंधित ३५ ट्रक चोरी झाल्याचे व यातून कोट्यवधींची माया संशयितांनी गोळा केल्याची बाब सूत्रांनी सांगितली. ट्रक हेराफेरीप्रकरणी मनियारला जळगाव, नाशिक पोलिसांनी अटक केली होती, अशी माहिती गुन्हेशाखा पोलिसांनी दिली.

अशी होती मोड्‌स...
कर्जात दबलेल्या मालकाचा ट्रक भाड्याने चालविण्यासाठी घेतला जात होता. या ट्रकचे स्पेअर पार्ट, चेसिस तसेच वाहन क्रमांक बदलला जात होता. त्यानंतर या ट्रकची परस्पर विक्री केली जात होती. ट्रक चोरी गेल्याचे मूळ मालकाला सांगून संशयितांची टोळी हात वर करीत असे. यानंतर मूळ मालक विमा कंपनीकडे दावा दाखल केला जाता होता. काही ट्रक चोरीही केले जात होते.

दीड वर्षापूर्वी आणले धंद्यात
शेख बाबर याचा गॅरेजचा व्यवसाय होता; परंतु, हेराफेरीचा ‘उद्योग’ वाढविण्यासाठी जावेद मनियार जाळे टाकीत होता. त्याने दीड वर्षांपूर्वी शेख बाबर याला गॅरेजला सोडचिठ्ठी देण्यास सांगत हेराफेरीत सहभागी करून घेतल्याची बाब गुन्हेशाखा पोलिसांनी सांगितली.

  पाच वर्षांपासून ट्रक हेराफेरीच्या धंद्यात
  पसार जावेद मनियारच मुख्य सूत्रधार
  आणखी एक संशयित ताब्यात

Web Title: cleaner truck success cheating crime