नांदेड : लघुलेखक लक्ष्मण असोले लाचेच्या जाळ्यात

प्रल्हाद कांबळे 
मंगळवार, 11 जून 2019

बिलोली येथील तक्रारदार व त्यांच्या इतर साथीदारांचे वाळू वाहतुक करणारे सहा टिप्पर तहसिल कार्यालयाने जप्त केले होते. त्यानंतर या टिप्पर चालकांनी एक लाख ३० हजार ८०० रुपयाचा दंड बँकेमार्फत भरला.

नांदेड : जप्त केलेले वाळू टीप्पर सोडण्यासाठी १९ हजाराची लाच घेणाऱ्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लघुलेखक लक्ष्मण असोले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. १०) दुपारी रंगेहात पकडले. 

बिलोली येथील तक्रारदार व त्यांच्या इतर साथीदारांचे वाळू वाहतुक करणारे सहा टिप्पर तहसिल कार्यालयाने जप्त केले होते. त्यानंतर या टिप्पर चालकांनी एक लाख ३० हजार ८०० रुपयाचा दंड बँकेमार्फत भरला. आवश्‍य कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर तक्रारदार व त्यांचे सोबतचे परिचीत सहा लोकांचे टीप्पर सोडण्याचे तहसिलदार यांच्या नावे उपविभागीय अधिकारी यांची स्वाक्षरी झालेले आदेश जावक विभागात देण्यासाठी लाचखोर लक्ष्मण कानबाराव असोले यांनी प्रत्येकी टिप्परला तीन हजार प्रमाणे २१ हजाराची लाच मागितली. परंतु अगोदरच दंड आकारल्यानंतर व सर्व कागदपत्रांची पुर्तता करून २१ हजार रुपये देेण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने सोमवारी (ता. १०) सकाळी नांदेड येथे येऊन एसीबी कार्यालयात तक्रार दिली.

यावरून या विभागाचे पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांनी तत्परता दाखवत आपल्या पथकासह बिलोली गाठले. दुपारी १९ हजाराची लाच घेणाऱ्या असोले याला अटक केली. हा सापळा यशस्वी करण्यासाठी शेख चांद, सुरेश पांचाळ, अंकुश गाडेकर, शिवहार किडे यांनी परिश्रम घेतले. बिलोली पोलिस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: clerk arrested for taking bribe in Nanded

टॅग्स