गिर्यारोहणातून मिळाले स्वावलंबनाचे धडे; गिर्यारोहक दीपक काेनाळे यांची ‘सकाळ’ला भेट

The climber Deepak Konale visited to Sakal media group at latur
The climber Deepak Konale visited to Sakal media group at latur

लातूर : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या स्पर्धेत टिकायचे असेल तर स्वत:ला ओळखता अाले पाहिजे आणि वेगळे काहीतरी केले पाहिजे. हा विचार घेऊनच गिर्यारोहणाच्या क्षेत्राकडे वळलो. मोहिमेवर असताना अचानक काही अडचणी उद्भवल्या तर त्यावर स्वत:लाच मात करावी लागते, हे या क्षेत्रातील सूत्र आहे. त्यामुळे मला स्वावलंबन, वक्तशीरपणाचे धडे मिळाले. ते धडे पुढील करीअरला आकार देण्यासाठी आयुष्यभर उपयोगी ठरतील... असा अनुभव लातूरचे युवा गिर्यारोहक दीपक काेनाळे सांगत होते.

आफ्रिकेतील टांझानिया देशात किलीमांजारो हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटीपासून १९ हजार ३४१ फुट आहे. पुण्यातील विक्रमवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोनाळे यांनी हे शिखर सर करून तेथे भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकावला होता. या कामगिरीची दखल सर्वप्रथम ‘सकाळ’ने घेतली होती. त्यामुळे मोहिमेवरून परत लातूरमध्ये आल्यानंतर कोनाळे यांनी सोमवारी ‘सकाळ’ला सदिच्छा भेट दिली. मोहिमेचे थरारक अनुभव सांगत त्यांनी आपल्या नेत्रदिपक कार्याला या वेळी उजाळा दिला.

कोनाळे म्हणाले, ‘‘देवणी तालूक्यातील लहानशा गावात माझा जन्म झाला. वडिल पोलीस अधिकारी होते. त्यामुळे शिक्षण जालना येथे झाले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे गाठले. खरंतर सुरवातीपासूनच मला निसर्गात फिरण्याची अावड होती. ती पुण्यात अाल्यानंतर आणखीनच वाढली. त्यातूनच गिर्यारोहणाच्या क्षेत्राकडे वळलो. अनेक महिने सिंहगड चढण्याचा सराव केला. अशा छोट्या-मोठ्या मोहिमांमधून आत्मविश्‍वास वाढत गेला. तो माझ्या गुरूंनी बराेबर हेरला. त्यामुळे किलीमांजारो शिखर सर करण्याची संधी मिळाली.’’

मनात भीती होती अन्‌ विश्‍वासही -
या शिखराच्या चढाईसाठी २९ जून ला सुरवात केली होती. त्यानंतरचे चार दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. शून्याच्या खाली तापमान, घाेंगावत जाणारे वारे, उभी चढण, दर दहा-वीस मिनिटांनी बदलणारे वातावरण अशा सगळ्या समस्यांना तोंड देत अतिशय काळजीपूर्वक माेहिम पूर्ण करता आली. त्यावेळी नक्कीच मनात भीती होती. पण ‘मी हे करू शकतो’ असा विश्‍वासही होता. या विश्‍वासाच्या बळानेच भीतीवर मात करता आली. त्यामुळेच दिवसाला १३, १४ तास चढाई करत राहिलो.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com