Election Results : औरंगाबादेत इम्तियाज जलील मारणार बाजी

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 23 मे 2019

पहिल्या फेरीनंतर वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी जोरदार आघाडी घेतली असून पहिल्या फेरीनंतर जलील यांना 18758 मते पडली असून चंद्रकांत खैरे यांना 11340, हर्षवर्धन जाधव यांना 13968 तर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांना 3665 मते पडली आहेत.

लोकसभा 2019 निकाल
औरंगाबाद - मतदान झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने मतमोजणी करण्यात येत असून औरंगाबादचा खासदार कोण हे सायंकाळपर्यंत निश्‍चित होईल. लोकसभेसाठी 23 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत मात्र, चार उमेदवारांमध्येच असेल. विद्यमान खासदारासमोर तीन विद्यमान आमदारांनी तगडे आव्हान दिले असून कोण होणार खासदार, याची उत्सुकता शिगेला
पोचली आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील औरंगाबाद मतदारसंघात बाजी मारणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. जलील यांनी जोरदार आघाडी घेतली असून जलील यांना 126282 मते पडली आहेत तर, चंद्रकांत खैरे यांना 105367, हर्षवर्धन जाधव यांना 105123 तर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांना 24969 मते पडली आहेत.

मतदारसंघ : औरंगाबाद फेरी : पहिली
चंद्रकांत खैरे (शिवसेना) -11340
सुभाष झांबड (काँग्रेस) -24969
इम्तियाज जलील (वंचित बहुजन आघाडी) - 126282

हर्षवर्धन जाधव (अपक्ष) - 105123

विधानसभानिहाय अशा होणार फेऱ्या 
कन्नड : 26 
औरंगाबाद मध्य - 24 
औरंगाबाद पश्‍चिम - 25 
औरंगाबाद पूर्व : 23 
गंगापूर : 23 
वैजापूर : 25


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close fight between Chandrakant Khaire and Subhash Zambad in Aurangabad constituency for Lok Sabha 2019