तिसऱ्यांदा फोडले कापड दुकान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

वाळूज - औरंगाबाद-नगर महामार्गावरील दहेगाव बंगला येथील कापड दुकान चोरट्यांनी तिसऱ्यांदा फोडल्याची घटना मंगळवारी (ता.१२) सकाळी उघडकीस आली. चोरांनी यावेळी दीड लाखांचा ऐवज लंपास केला असून दुकानातील सीसीटीव्हीत एक चोर कैद झाला आहे. 

याआधी दोन वेळा याच दुकानात झालेल्या चोरीचा तपास लावण्यात वाळूज पोलिसांना यश आलेले नसतानाच पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

नरसापूर येथील विजय अण्णासाहेब शिंदे यांचे औरंगाबाद-नगर महामार्गावरील दहेगाव बंगला येथे कापडाचे दुकान आहे. दुकानात यापूर्वी दोन वेळा चोरी झाल्याने शिंदे यांनी लोखंडी चॅनेलचे गेट लावले. त्यामुळे शटर उचकटणे शक्‍य न झाल्याने अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागची भिंत फोडून आत प्रवेश केला. दुकानातील अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे महागडे कपडे घेऊन चोरांनी पोबारा केला. 

चोरीची ही घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली. शिंदे यांनी वाळूज पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चोरीचा पंचनामा केला. या चोरीची नोंद वाळूज ठाण्यात करण्यात आली; मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

पाेलिसांचे अपयश
एकाच कपड्याच्या दुकानात दोन वेळा चोरी होऊनही वाळूज पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आले नाही. आता तिसऱ्यांदा त्याच दुकानाला लक्ष्य केल्यामुळे या परिसरात चोरट्यांची दहशत वाढली आहे. दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रात्री ३.३० वाजेच्या सुमारास एक चोरटा दुकानात घुसून उचकापाचक करीत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

Web Title: cloth shop theft in aurangabad