वातावरण ढगाळ; तरीही तापमानात नो डिस्काउंट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

औरंगाबाद - मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू असताना शहरावर ढगांचा डेरा कायम आहे. सोमवारी (ता. २२) पावसाने काही काळ शिडकावा करीत शहरवासीयांना थोडासा थंडावा दिला असला तरी मंगळवारी (ता. २३) तापमानात निसर्गराजाने कोणतेही डिस्काउंट दिलेला नाही.  औरंगाबाद शहराचे तापमान आता ४१ अंशांचा पारा आलांडून पुढे सरकत  असतानाच मंगळवारी हा आकडा ४१.३ अंशांपर्यंत गेला. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढग ठाण मांडून आहेत. ढगांच्या आडून ऊन आणि सावलीचा खेळ सुरू असल्याने शहरात दिवसातून उन्हापासून थोडीशी उसंत मिळत आहे.

औरंगाबाद - मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू असताना शहरावर ढगांचा डेरा कायम आहे. सोमवारी (ता. २२) पावसाने काही काळ शिडकावा करीत शहरवासीयांना थोडासा थंडावा दिला असला तरी मंगळवारी (ता. २३) तापमानात निसर्गराजाने कोणतेही डिस्काउंट दिलेला नाही.  औरंगाबाद शहराचे तापमान आता ४१ अंशांचा पारा आलांडून पुढे सरकत  असतानाच मंगळवारी हा आकडा ४१.३ अंशांपर्यंत गेला. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढग ठाण मांडून आहेत. ढगांच्या आडून ऊन आणि सावलीचा खेळ सुरू असल्याने शहरात दिवसातून उन्हापासून थोडीशी उसंत मिळत आहे. सोमवारी शहराच्या वातावरणात झालेला बदल आणि त्यातून काही मिनिटांसाठी पडलेला पाऊस जमिनीला भिजवून गेला असला; तरी त्यामुळे तापमानात कोणतेही डिस्काउंट शहरवासीयांना मिळालेले नाही. मंगळवारी (ता.२३) शहराचे तापमान ४१.३ अंशांवर राहिले; तर किमान तापमानाचा आकडा हा २६ अंश राहिला. 

चार दिवस पावसाचे
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आठवडाभर ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. त्यात २६ ते २९ मेदरम्यान मॉन्सूमपूर्व पाऊसही होऊ शकतो; मात्र तापमान चढेच राहणार आहे. त्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना कुठलाही दिलासा मिळणार नाही.

Web Title: Cloudy the atmosphere in Aurangabad