गोपीनाथ मुंडे लोकोत्तर लोकनेते : देवेंद्र फडणवीस

प्रवीण फुटके/दिगंबर देशमुख
रविवार, 3 जून 2018

परळी : कुठलेही राजकीय पाठबळ, संघटना मागे नसताना हिंमत आणि आत्मविश्वासाने नाथरा (ता. परळी) ते न्यूयॉर्क असा प्रवास केला. त्यामुळेच दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे खऱ्या अर्थाने लोकोत्तर लोकनेते होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त रविवारी (ता.3) परिसरातील गोपीनाथ गडावर झालेल्या अभिवादन 'सामाजिक उत्थान दिन' कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले, मंत्री राम शिंदे, मंत्री महादेव जानकर, मंत्री विजयराव देशमुख, मंत्री सदाभाऊ खोत, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, विजयराव पुराणिक, आमदार संगीता ठोंबरे, आमदार वसुरजितसिह ठाकूर, आमदार आर. टी. देशमुख, आमदार शिवाजी कर्डीले, मोनिका राजळे, विजय गव्हाणे यांच्यासह मुंडेंच्या पत्नी प्रज्ञा मुंडे, कन्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे यांच्यासह लोकांची मोठी
उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले, दिवंगत मुंडे पराभवाने खचले नाहीत, विजयाने मातले नाहीत. मुंडे वंचितांचा आवाज होते. महाराष्ट्राचा सामाजिक राजकीय इतिहास त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाहीत. गृह खाते हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी मुक्त व खंडणी मुक्त करण्याचे काम त्यांनी केले. सहकार क्षेत्रात अनुभव नसताना उतरले दबदबा निर्माण केला. त्यांचा वारसा पंकजा मुंडे चालवत आहेत. 

Web Title: CM Devendra Fadnavis Praises Late Gopinath Munde