मराठवाड्याचा दुष्काळ काेकण करणार दूर : फडणवीस

CM Devendra Fadnavis rally at Mukhed Marathwada
CM Devendra Fadnavis rally at Mukhed Marathwada

मुखेड : मागील काही वर्षापासून पडत असलेल्या अनियमित पावसामुळे मराठावाड्यात दूष्काळाची दाहकात निर्माण झाली आहे. काेकणात पडणारे पावसाचे पाणी वाहून समु्द्राला मिसळते यावर पर्यंत म्हणून काेकणातील 167 टीएमसी पाणी नदीजाेड प्रकल्पाच्या माध्यमातून गाेदावरीच्या खाे-यामध्ये साेडण्यासाठी आपण प्रयत्नशील असून या पिढीने पाहिलेला दूष्काळ पुढच्या पिढीला दिसणार नाही यासाठी भाजपा उमेदवाराला विजयी करा असे आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस भाजप उमेदवार तुषार राठाेड यांच्या प्रचार सभेत केले.

मुखेड विधानसभा मतदासंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार डाॅ. तुषार राठाेड यांच्या प्रचारार्थ कमळेवाडी फाटा येथील आश्रमशाळेच्या प्रांगणात प्रचारसभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. आमदार राठाेड  म्हणाले की, मागील साडेचार वर्षात मुखेड मतदारसंघामध्ये राष्ट्रीय महामार्गाची उभारणी , मुख्यमंत्री ग्रामसडक याेजनेतून 70 वाडी-तांड्यांना रस्ते , लेंडी
प्रकल्पासाठी अडीचशे काेटी रूपयांचा निधी देऊन प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करून विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे बाेलताना फडणवीस म्हणाले की, देशात काँग्रेसची परिस्थिती वाईट झाली आहे. शेतक-यांच्या कर्जमाफीबाबत बाेलतांना सांगितले की, शेवटच्या शेतक-याची कर्जमाफी हाेईस्ताेवर ही याेजना कार्यान्वित राहणार असून शेतक-यांना आमच्या सरकारने पीकविमा,  पंतप्रधान आवास याेजना आदींच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. 

आंतरराज्यीय लेंडी प्रकल्पाबाबत बाेलतांना म्हणाले की, काँग्रेसने मागील 30 वर्षात तीनशे काेटी तर आमच्या सरकारने अवघ्या पाच वर्षात दाेनशे 90 काेटी रूपये या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. केंद्रात भाजपा व राज्यात भाजपसरकार बहुमताने येणार असल्याने येत्या वर्षभरात लेंडी प्रकल्पग्रस्तांचे सर्वप्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सुत्रसंचलन व आभार प्रा. यशवंत बाेडके यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com