युती कधी होईल हे कळणारही नाही : देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

फडणवीस म्हणाले, भाजपमध्ये मेगाभरती आणि विरोधकांची मेगागळती सुरु आहे. प्रवेशाबाबत आचमी फील्ट्रेशन पॉलीसी आहे. जे लोक जास्त दिवस आमच्यासोबत राहू शकतात, जिथे आमच्या वाट्याची जागा आहे अशाच ठिकाणी आम्ही प्रवेश देत आहोत. काही ठिकाणी मित्रपक्ष शिवसेनेत प्रवेश होत असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बीड : भाजपची महाजनादेश यात्रा ही पारंपारिक आहे. विरोधात असताना आम्ही संघर्षयात्रा काढतो तर सत्तेत असताना संवाद यात्रा काढतो. भाजप - शिवसेना युतीबाबत लोकसभा निवडणुकी अगोदरही माध्यमांनी चर्चा केली. पण, आम्ही एकाच दिवसात चर्चा करुन युती केली. यावेळीही युती कधी होईल हे कळणारही नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा सोमवारी (ता. 26) जिल्ह्यात पोचून आष्टी व बीडला सभा झाल्या. बुधवारी (ता. 27) सकाळी त्यांनी महाजनादेश यात्रेबाबत माध्यमांना माहिती दिली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, यात्रेचे संयोजक आमदार सुरजितसिंह ठाकूर, संगीता ठोंबरे, भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, लक्ष्मण पवार, सुरेश धस, सविता गोल्हार, रमेश पोकळे, केशव उपाध्ये उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, भाजपमध्ये मेगाभरती आणि विरोधकांची मेगागळती सुरु आहे. प्रवेशाबाबत आचमी फील्ट्रेशन पॉलीसी आहे. जे लोक जास्त दिवस आमच्यासोबत राहू शकतात, जिथे आमच्या वाट्याची जागा आहे अशाच ठिकाणी आम्ही प्रवेश देत आहोत. काही ठिकाणी मित्रपक्ष शिवसेनेत प्रवेश होत असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी महाजनादेश यात्रा आणि विकास कामांचाही उहापोह केला. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य, संवाद आणि काँग्रेसच्या पर्दाफाश यात्रेवरही त्यांनी टिका केली. युतीबाबतच्या प्रश्नावर त्यांनी युती होणार असल्याचे सुतोवाच केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis speaks at Mahajanadesh Yatra in Beed