नायगाव मतदारसंघाचे पालकत्व घ्यायला तयार : फडणवीस

devendra Fadnavis
devendra Fadnavis

नायगाव (नांदेड) : सातत्याने चुकीच्या उमेदवाराला निवडून दिल्यामुळे हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. रस्त्याच्या समस्या, बाभळी बंधारा, सिंचन समस्या, कृष्णुर येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह सगळ्या समस्या मिटवू. तुम्ही राजेश पवार यांच्या पाठीशी उभे रहा मी नायगाव विधानसभा मतदार संघाचं पालकत्व घ्यायला तयार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरसी ता. नायगाव येथे जाहीर सभेत दिले. 

भाजप, रिपाई मित्र पक्षाचे उमेदवार राजेश पवार यांच्या प्रचारार्थ बोलत होते. 
यावेळी विचार मंचावर प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळी कर, आमदार सुभाष साबणे, माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, महानगराध्यक्ष प्रवीण साले, राजेश पवार, पूनम पवार, माणिक लोहगावे, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, डी. बी. पाटील होटाळकर,   शिवराज पाटील होटाळकर, श्रीकांत देशपांडे, अशोक पाटील मुगावकर, राजू गंदिगुडे, पांडुरंग शिंदे  दिलीप धर्माधिकारी, राजेश देशमुख, रूपेश देशमुख,  विनायक कुलकर्णी, विजय डांगे, विश्वनाथ बन्नाळीकर, बाळू खोमणे, रविंद्र पोतगंटीवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com