सरकारची कामगिरी बघून पुन्हा कौल द्यावा : मुख्यमंत्री

CM Mahajanadesh yatra at Jalna
CM Mahajanadesh yatra at Jalna

जालना : जालना जिल्ह्यात आयसीटी, सीडपार्क, ड्रायपोर्टसारखे बडे प्रकल्प होत असल्यामुळे या शहराचा विकास झपाट्याने होणार आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असल्याने जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. वाॅटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या  पाणी टंचाईचा प्रश्न संपुष्टात येईल, पीकविमा आणि कर्जमाफीच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. सरकारची पाच वर्षाची कामगिरी बघून सरकारला पुन्हा काैल द्यावा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. महाजनादेश यात्रेला  जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बुधवारी (ता. 28) शहरात मुक्कामी होती. गुरूवारी (ता. 29) सकाळी फडणवीस यांनी विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले.येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कटिबध्द असल्याचा पुनरूच्चार  केला.वॅाटरग्रीड  आयसीटी, ड्रायपोर्टसारखे बडे प्रकल्प शहरात आल्यामुळे या शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यासाठी सरकारकडून मोठा निधी देण्यात आला आहे. पाणी अडविण्यासाठी जलयुक्तशिवार अभियानच्या माध्यमातून जाणिवपप्रयत्न केले आहेत.या अभियानाच्या बाबत न्यायालयानेही सकारात्मक विचार व्यक्त केले आहेत. त्यामुळे  हे अभियान यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज माफी देऊन त्यांना आधार देण्याचे काम सरकारने  केले आहे. गेल्या पाच वर्षातील कामगिरी बघून  आगामी निवडणुकीत मतदारांनी कौल द्यावा असे  आवाहन त्यांनी केले.यावेळी केंद्रीयराज्यमंत्री रावसाहेब दानवे, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह राज्यमंत्री अर्जुन खोतकर , आमदार संतोष दानवे यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com